Maharashtra Vidhanpatishad Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी, सदाभाऊ खोत यांच्यासह ५ नावे जाहीर; VIDEO

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १ जुलै २०२४

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहे. याबाबत आता सर्वात महत्वाची बातमी समोर आली असून पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड लोकसभेच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ नावांची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवली होती. यामधून पाच नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पिछेहाट पाहता भारतीय जनता पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. राज्यात सध्या मराठा- ओबीसी वाद सुरू आहे. अशातच मुंडे यांच्या पराभवामुळे ओबीसी मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देत मतांचे विभाजन टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'ही लढाई विचारधारांची'; राहुल गांधींनी सरकारवर ओढले ताशेरे

Mumbai Hit and Run Case : मुंबईत आणखी एक हिट अँड रन; चेंबूरमध्ये काँग्रेस खासदारांच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक

Rahul Gandhi Kolhapur: राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान! 'कौलारु' घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा; टेम्पो चालकाचे कुटुंबीय भारावले

मानला रे तुला! Duleep Trophy नंतर Irani Cup मध्येही तनुष कोटियनचा जलवा

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

SCROLL FOR NEXT