आगमन मार्ग - पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, CBD बेलापूर, जुई नगर, सानपाडा ब्रिज खालून APMC मार्केट
10 ते 15 हजार गाड्या वर नमूद केलेल्या मार्गाने येणार उरलेल्या गाड्या उरण फाट्यावरून पाम बीच रोडवर सगळी वाहन पार्क होतील
रोहित पवार लवकरच बाहेर येतील
आता लोकांना समजत आहे की नक्की काय होत आहे
आपण कुठल्या थरावर जात आहोत
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे
नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई
भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडींग करण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून एकाला अटक
नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून ATS ने केली अटक
इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक
हुसेफ शेख अस ATS ने अटक केलेल्या आरोपीचं नाव
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या गणपुर घाटावर नाव उलटल्याची घटना मंगळवारी 11 च्या सुमारास घडली होती. या घटनेत 6 महिला बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी तीन महिलांचे मृतदेह सापडले असून 30 तास उलटले तरी तीन महिला अद्यापही बेपत्ता आहेत.
मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आनंदनगर एमआयडीसीतील कॅनेरा इंजिनिअरिंग कंपनीला भीषण आग
घटनास्थळी अग्निशमन दलाचा गाड्या दाखल.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू
कंपनीमध्ये बनतं कुलिंग फायर
नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट
- ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना दिलासा
- ACB कडून दाखल गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर
- जिल्हा न्यायालयाने बडगुजर यांना दिला दिलासा
- पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर आणि इतर दोघांवर आरोप
इंडिया आघाडी मध्ये मोठी अस्वस्थता आहे.
आम्हांला आधीच माहीत होत इंडिया आघाडीमध्ये मोठी बिघाडी होणार आहे.
ममता बँनर्जी यांना देखील इंडिया आघाडी मान्य नव्हती.
उत्तर महाराष्ट्रात मोठा पक्ष प्रवेश झालेला आहे. यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील मोर्चा विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात
मनोज जरांगेंच्या आंदोलनीसी कुठलीही परवानगी नसताना हे सर्व सुरू आहे.
गाड्या, ट्रॅक्टर, बैलगाड्यासह लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत येत आहे.
जर परवानगी दिली तरी आम्ही त्याला चँलेंज करु.
मात्र परवानगी नसताना हे सर्व घडत आहे.
२९ पोलिस अधिकारी गंभीर जखमी आहे.
३०२ सारख्या तीन घटना घडल्या अजूनही कुणाचीही नाव एफआयआरमध्ये नाही.
याचिकाकर्त्यांचा कोर्टात दावा
हिंगोलीत तरुणाची भररस्त्यात गळा चिरून हत्या
रक्ताच्या थारोळ्यात पडला मृतदेह, आंबा चोंढी फाट्याजवळील घटना
घटनास्थळी कुरुंदा पोलिसांनी घेतली धाव
राहुल गवळी मृत तरुणाचं नाव, खुनाचे कारण अद्याप आस्पष्ट
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शेवगाव मार्गावर पैठणच्या खुल्या जिल्हा कारागृहसमोर बस आणि दुचाकीच्या अपघात
अपघातामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला
अपघातानंतर बाईकने घेतला पेट
नागपुरातील अंगणवाडी सेविकांचे अंगणवाडी आंदोलन
अंगणवाडी सेविकांचे वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन
नागपुरातील संविधानात चौकात अंगणवाडी सेविकांचे शाळकरी मुलांना घेऊन अंगणवाडी आंदोलन
मागील अनेक दिवसांपासून विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहेत
26 हजार रूपय वेतन लागू करा, तसेच ग्रॅज्युटी लागू करा, पेन्शन लागू करा, अशा मागण्यासाठी आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नव मतदारांसोबत साधणार संवाद
देशातील सुमारे ५० लाख नव मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी 'नमो नव मतदाता संमेलना'चे आयोजन
मुंबईत केसी कॉलेज व विल्सन कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्द्वारे पंतप्रधान बातचित करणार
मुंबई युवा मोर्चाकडून उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री मंगल प्रभात लोढा विल्सन महाविद्यालय, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली
आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या मोर्चाबाबत सुनावणी घेण्याची मागणी खंडपीठांसमोर केली होती
न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने वैयक्तिक कारणास्तव या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता
रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले
सुप्रीया सुळे ईडी कार्यालयापर्यंत होत्या सोबत
तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर
निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर
महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर
जिल्हा निवड समितीने तयार केलेली यादी जाहीर
राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
रोहित पवार राष्ट्रवादी कार्यालयात जाण्यासाठी निघाले
पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
शरद पवार यांची भेट घेऊन आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून ईडी चौकशीला जाणार
नागपूर : पोलीस कोठडीत ब्लँकेटच्या साहायाने गळफास घेत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
हुकडेश्वर पोलिस स्टेशनमधील घटना
लोखंडी सळाईला लटकून आत्महत्येचा केला प्रयत्न
आरोपीला रुग्णालयात केले दाखल, उपचार सुरू
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात होता अटकेत
नागपूर : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा बहिष्कार
सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती
दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत सराव परीक्षा घेण्याचे कामात शिक्षक व्यस्त
शैक्षणिक कार्य गरजेचे असताना सर्वेक्षणाच्या कामात गुंतवणे योग्य नसल्याच म्हणत सर्वेक्षणावर बहिष्कार
यासंबंधीचे पत्र विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडबालेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठवले पत्र
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. या मोर्चामध्ये बारामतीतून हजारो मराठा बांधव मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सहभागी होण्यासाठी काही वेळात निघणार आहेत.
नाशिकच्या निफाडमध्ये किमान तापमानात घसरण झाली असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील नीचांकी नोंद झाली. द्राक्ष पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
नवी दिल्ली - मराठा आरक्षणाबाबत आज महत्वाचा दिवस
सुप्रीम कोर्टात आज क्युरेटीव्ह पिटिशनवर सुनावणी
राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या संजीव खन्ना आणि बी आर गवई यांच्यात बंद दाराआड सुनावणी होणार
दुपारी १.३० वाजता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये सुनावणी होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.