Onion News Saam TV
महाराष्ट्र

Onion Export News: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 40% निर्यात शुल्कातून कर्नाटकच्या कांद्याला वगळलं; राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय?

Onion Export Price News: एकीकडे महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात शुल्क कायम असताना कर्नाटकमधील कांद्याला सवलत दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. ३० मे २०२४

कांद्याच्या निर्यातबंदीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्नाटकच्या बेंगलोर रोझ कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात शुल्क कायम असताना कर्नाटकमधील कांद्याला सवलत दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने घातलेल्या कांदा निर्यातबंदीवरुन राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. केंद्र सरकारच्या या निर्णायाविरोधात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. त्यानंतर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ४० टक्के निर्यात शुल्क लागु केले होते. यावरुनही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अशातच आता केंद्र सरकारने या ४० टक्के निर्यात शुक्लामधून कर्नाटकच्या बेंगलोर रोझ कांद्याला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातशुल्क कायम असताना केंद्र सरकारने कर्नाटकच्या कांद्याला दिलेली सवलत वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधीही केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी घातली होती तर गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी होती. यावरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातशुल्क कायम असताना कर्नाटकमधील कांद्याला सवलत मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT