Latur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident News: हृदयद्रावक घटना! भरधाव कारने दुचाकीला उडवले, पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Latur Latest News: लातूर- उदगीर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाले आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले| लातूर, ता.८ जुलै २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांचे सत्र सुरू आहे. वरळीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच लातूरमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, लातूर- उदगीर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात मरण पावलेले रवी गुळंगे हे उदगीर येथील एका शाळेत शिक्षक पदावर होते.

पत्नीसह ते दुचाकीवरुन जात असताना उदगीरच्या मलकापूर नजिक स्विफ्ट डिझायर गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात रवी गुळंगे वय (40) वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील धारखेडा पाटी जवळ कर्तव्य बजावून परत येणाऱ्या हिंगोली पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास भरधाव दुचाकी चालकाने धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे, या घटनेत पोलीस अधिकारी अफसर पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती औंढा पोलिसांनी दिली असून याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT