Former Shiv Sena taluka chief Shivajirao Shinde of Dadahari Wadgaon in Beed district Saam Tv
महाराष्ट्र

Political News : मोठी बातमी! शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Eknath Shinde Shivsena : बीडमधील दादाहरी वडगाव येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Alisha Khedekar

  • बीड जिल्ह्यातील दादाहरी वडगाव येथील राजकरणात शोककळा

  • शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या

  • ४ महिन्यांपूर्वी झाला होता कोयत्याने हल्ला

  • पोलीस तपास सुरु

बीड तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी शिंदेंवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले गेले. मात्र त्यांनी दादाहरी वडगाव येथील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे हे शिवसेनेमध्ये तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग होता.

दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर शिवाजीराव शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दादाहरी वडगाव परिसरातील नागरिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी शोक व्यक्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेशी संबंधित अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शिवाजीराव शिंदे यांच्या निधनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

Ideal age gap in marriage: सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

जबरदस्त! रेल्वे घडवणार 'वनदर्शन', जंगल सफारी, IRCTC चं पर्यटन पॅकेज कसं मिळेल, कधीपासून होणार सुरू? वाचा

SCROLL FOR NEXT