Breaking News and live updates in Marathi | 16 April 2024 Latest Update on Uddhav Thackeray, Salman Khan, CM Eknath Shinde, Pune and overall Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: खराडीत खासगी जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Maharashtra Live Marathi Batmya and Updates (16 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...

Vishal Gangurde

खराडीत खासगी जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात जीव रक्षक उपस्थित नसल्यामुळे आणि येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे जलतरण तलाव संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अतिक तांबोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदण्यात आलाय.

सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी केली होती गॅलक्सी अपार्टमेंटची रेकी

- सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी इमरतीबाहेर कोणी नाही याची आरोपींनी केली होती खात्री

- सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून १०० मीटरवर बाईक थांबवून पायी केली होती रेकी

- इमारतीबाहेर पहारेकरी नाहीत याची खात्री झाल्यावर बाईकवरून केला होता गोळीबार

- गुन्हे शाखेने विक्की गुप्ता आणि सागर पाल नावाच्या दोघांना सोमवारी रात्री गुजरातमधून केली अटक

अजून बरेच जण आमच्या पक्षात येणार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

- शरद पवार गटाच्या गळाला मोठे मासे लागण्याची शक्यता

- भाजप, शिवेसना शिंदे गटाचे मोठे नेते येत्या काही दिवसांत शरद पवार गटात येण्याची शक्यता

- अजून बरेच जण आमच्या पक्षात येणार

- जयंत पाटील यांचे मोठं विधान

- जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार नक्षलवाद्यांची संख्या 29 वर

- छत्तीसगढ राज्याच्या कांकेर जिल्ह्यात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक

- कांकेरच्या छोटे बैठिया पोलिस ठाण्याच्या कालपर जंगलात चकमक

- कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार नक्षलवाद्यांची संख्या 29 वर

- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलाला मोठे यश

पालघरमध्ये १४ वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू

- राज्यात उन्हाचा पारा वाढत चाललाय

- उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढतेय

- पालघरमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय

- उकाड्यामुळे उष्माघात होऊन १४ वर्षांच्या मुलीचा झाला मृत्यू

मालेगावात करणी सेनेच्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा

- मालेगावात भाजपविरोधात असलेल्या चिंतन सभेचा भाजप कार्यकर्त्यांकडून भांडाफोड

- करणी सेनेच्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा

- भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्याविरोधात होती चिंतन सभा

- भाजपा कार्यकर्त्यांनी भर सभेतून बॅनर काढल्याने राडा

- मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे सुरू होती बैठक

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींची दुचाकी पोलिसांनी केली जप्त 

- सलमान खानच्या घरावर गोळीबार करताना वापरण्यात आलेली दुचाकी गुन्हे शाखेने केली जप्त

- विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दुचाकीचा केला होता वापर

- गोळीबार केल्यानंतर माउंट मेरीजवळ बाईक सोडून दोघांनी काढला होता पळ

- पनवेल वरून आरोपींनी २४,००० रुपयांना विकत घेतली होती दुचाकी

यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान

- लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला

- पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आला होता.

रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, ४८ तास प्रचारापासून बंदी

- काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

- रणदीप सुरजेवाला यांना ४८ तास निवडणूक प्रचारापासून बंदी

- भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे आयोगाने घातली बंदी

- भाजपकडून या वक्तव्या विरोधात दाखल केली होती निवडणूक आयोगात तक्रार

Pune Rain News: पुण्यात पावासाला सुरूवात, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा 

- पुणे शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

- गेल्या दोन दिवसांपासून हवेत जाणवत होता उखाडा

- प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर झाले होते हैराण

- उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा

- पावसाच्या सरीने हवेत गारवा

Salman Khan News: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट

- सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

- गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट

- मुख्यमंत्र्यांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी घेतली भेट

शरद पवारांचा राज्यात मॅरेथॉन दौरा, 22 दिवसांत होणार 50 सभा

- शरद पवार प्रचारासाठी करणार राज्याचा मॅरेथॉन दौरा

- शरद पवारांच्या राज्यात २२ दिवसांत ५० सभा

- १७ तारखेला नगरला मुक्कामी असणार

- १८ एप्रिलपासून बारामतीतून सभांना होणार सुरुवात

- ११ मेपर्यंत शरद पवारांचा राज्यभरात मॅरेथॉन दौरा

- एका दिवसाला घेणार तीन ते चार सभा

नाशिकची जागा शिवसेनेलाच, मुख्यमंत्री शिंदेही आग्रही - बोरस्ते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. नाशिकच्या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली. नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल. मुख्यमंत्रीही आग्रही आहेत, असं शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितलं. नाशिकची जागा आम्हाला सुटेल असा विश्वास आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत निर्णय होईल असा अंदाज आहे, असंही ते म्हणाले.

मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

सोलापूर :

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरला

शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेसाठी ही लढत असेल, असं धैर्यशील यांनी सांगितलं.

पुण्यात देवरुखकर वाड्याला भीषण आग; ६ अग्निशमन बंब घटनास्थळी

पुण्यातील देवरूखकर वाड्याला आग लागली. या आगीनं काही वेळानं रौद्ररुप धारण केलं. आग मोठ्या प्रमाणात पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी घेतला बारामतीसाठी उमेदवारी अर्ज

सुनंदा राजेंद्र पवारांनी घेतला बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

अजित पवार यांच्यापाठोपाठ सुनंदा राजेंद्र पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतला अर्ज

लक्ष्मण खाबिया यांनी घेतला सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडी ४८ जागा जिंकणार, माझा आकडा महाराष्ट्रातला - उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी 48 जागा जिंकणार, उद्धव ठाकरेंना विश्वास

त्यांचा 45 प्लस हा आकडा देशाचा आहे. माझा आकडा हा महाराष्ट्राचा आहे, भाजपला टोला

सोलापुरात महायुतीची रॅली सुरू, फडणवीसही होणार सहभागी

महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी भाजपकडून सोलापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन

सोलापूरमधील डफ्रिन चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रॅलीत होणार सहभागी

जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत झाले सहभागी

महायुतीच्या उमेदवारांची फायनल यादी तयार, उद्या घोषणा

महायुतीच्या उमेदवारांची फायनल यादी जाहीर झाली असून उद्या घोषणा होणार, शिवसेना नेते संजय शिरसाट यांची माहिती

महाविकास आघाडीवरही केली टीका, आघाडीत झालेली बिघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी केलेली दगडफेक सर्वांनी पाहिली आहे.

४५ प्लसचा संकल्प केला असून राज ठाकरे आमच्यासोबत.

२२ तारखेनंतर सभांचा धडाका सुरू होत आहे. महायुती लढायला सज्ज झाली.

सस्पेन्स राजकारणात कधीही चांगला, नाराजीची चर्चा होऊ नये हा विषय होता. उमेदवार बदलले म्हणून नामुष्की नसल्याचंही स्पष्टीकरण

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार

सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार

खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता

दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता

मोठी बातमी! CSMT स्थानकातून 40 लाखांची रोकड जप्त

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधून लाखोंची रोकड जप्त

जीआरपी आणि आरपीएफची संयुक्त कारवाई

कपड्याच्या पार्सलच्या नावाखाली पाठवली होती रोकड

आरपीएफला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आली कारवाई

जीआरपीने आयकर विभागाला दिली माहिती

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, अटक आरोपी बिश्नोई टोळीच्या संपर्कात

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात केलं हजर

वैद्यकीय तपासणी करताच विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना गुन्हे शाखेने केलं हजर

पोलीस कोठडीची मागणी करणार, दोघेही लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात असल्याचं तपासात उघड

मनसे नेते घेणार राज्यपालांची भेट, दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मुद्द्यावर मनसेचे शिष्टमंडळ येत्या २-३ दिवसांत घेणार राज्यपालांची भेट

मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात घेणार राज्यपालांची भेट

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे.

अनेक भागांत पिण्यासाठी पाणी नाही.

त्यामुळे सरकारकडून उपाययोजना लवकर करण्यात याव्यात म्हणून घेणार भेट

शिष्टमंडळात ग्रामीण भागातील नेत्यांचा समावेश, दिलीप धोत्रे, राजू उंबरकर यांचा समावेश

दुष्काळस्थितीवर सरकारने लवकर लक्ष द्यावे म्हणून घेणार भेट

नाशिकमधील गंगापूर धरणातील गाळ काढण्यास सुरुवात

नाशिकच्या गंगापूर धरणातून गाळ काढण्याचा कामाला आजपासून सुरूवात

जिल्हाधिकारी शर्मा आणि काही सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने गाळ काढण्याचे काम सुरू

पुढील महिनाभर सुरू राहणार गाळ काढण्याचे काम

गंगापूर धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढणार

गंगापूर धरणासह जिल्ह्यातील इतरही काही धरणांतून गाळ काढणार, जिल्हाधिकारी शर्मा यांची माहिती

धरणाच्या बाजूला गाळ कमी असतो. त्यामुळे धरणाच्या मुख्य भागातून गाळ काढण्याची गावकऱ्यांची मागणी

कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन, शाहू महाराज आज अर्ज भरणार

कोल्हापूर :

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी जय्यत तयारी केली आहे. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यश राजे देखील रॅलीत सहभागी झाले आहेत.

दसरा चौकातून सकाळी ११ वाजता शक्‍तिप्रदर्शनाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहेत.

सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपींना मुंबईत आणलं, पोलिसांकडून चौकशी होणार

बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक केली. त्यानंतर आज त्यांना गुजरातमधून मुंबईत आणण्यात आले. क्राईम डीसीपी विशाल ठाकूर आणि क्राईम पी आय दया नायक यांच्या टीमने आरोपींना गुजरात येथून ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले आहे. आता या दोन्ही आरोपींची मेडिकल तपासणी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात केल्यानंतर त्यांना दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प रॅली

सोलापुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प रॅली

- सोलापूर - माढा लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करत आहेत अर्ज दाखल

- अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप सोलापूर शहरात विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

- छत्रपती संभाजीराजे चौकातून महाराजांना अभिवादन करून रॅलीला होणार सुरुवात

- या रॅलीसाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सोलापूर शहरात होणार दाखल

राजकीय संस्कृती काही लोकांनी बिघडवली : रोहित पवार

रोहित पवार काय म्हणाले?

राजकीय संस्कृती काही लोकानी बिघडवली आहे. लोकांची काळजी घेणार सरकार या देशात येऊदे; रोहित पवारांचं तुळजाभवानी देवीला साकड

झेलम नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; ४ लोकांचा मृत्यू

झेलम नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली

श्रीनगरच्या बटवारा मधील घटना

दुर्घटनेत ४ लोकांचा मृत्यू

अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती

प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका असणार आहे

महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवर भर

पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात घेणार १२५ सभा

पक्षातील डॅमेज कंट्रोल घेत असताना फडणवीसांकडून सभांचा धडाका

एकट्या फडणवीसांच्या राज्यात १२५ सभांचे नियोजन

मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा : विशाल पाटील

सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील म्हणाले, '22 तारखेपर्यंत अर्ज राहिला तर बंडखोरी आणि पक्षाने उमेदवारी नाही दिली. तर पुढची चर्चा.. मला विश्वास वाटतो की, एकंदरीत परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी याचा विचार करेल. मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे'.

सलमान खान गोळीबार प्रकरणात पोलीस पत्रकार परिषद घेणार

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

मुंबई पोलिसांची १ वाजता पत्रकार परिषद

गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम घेणार पत्रकार परिषद

तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी सही दिली नाही; उदयनराजेंची खरमरीत टीका

खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीसाठी त्यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यात शासनाच्या जागा असूनही जागेचे कारण देत पृथ्वीराज चव्हाण यांनी सही दिली नव्हती. त्यांना सही करता येत नाही का? ते सही करत नाहीत हे समजलं नाही, अशी खरमरीत टीका उदयनराजेंनी केली आहे.

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात

मुंगसे गावा जवळ अपघात

एसटी बस व दुचाकींचा झाला अपघात

दुचाकीवरून आजोबा दोन शाळकरी विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यात जात असताना झाला अपघात

अपघातात आजोबा व ऐका विद्यार्थिनींचा मृत्यू तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी

अपघातामुळे मुंगसे ग्रामस्थांनी महामार्गावर केला रास्ता रोको

पुणे जिल्ह्यातील टॅंकर्सची संख्या दीडशेच्या घरात

पुणे जिल्ह्यातील ११७ गावे, ७६२ वाड्यांना टँकरमध्ये पाणी. पुणे जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार १५ लोकसंख्या ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सद्यःस्थितीत ११७ गावे आणि ७६२ वाड्या-वस्त्यांना १४८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील काही गावांना गेल्या वर्षभरापासून बारमाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे काही गावांना गेल्या वर्षभरापासून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

टँकरवर अवलंबून असलेली तालुकानिहाय लोकसंख्या

पुरंदर --- ९६ हजार ६९९

आंबेगाव --- २० हजार ७३९

बारामती --- ३१ हजार ६८७

भोर --- २ हजार २६१

दौंड --- ८ हजार ४४३

हवेली --- ४ हजार ६८२

इंदापूर --- ७ हजार २५०

जुन्नर --- १८ हजार ४२०

खेड --- ७ हजार ५३७

शिरूर --- २५ हजार २९७

एकूण --- २ लाख २३ हजार १५

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT