Today's Marathi News Live  Saam tv
महाराष्ट्र

Today Marathi News : न्हावा शेवा बंदरावर सुपारी तस्करीचा पर्दाफाश

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (12 june 2024) : चंद्रबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी , राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यातील पावसाच्या अपडेट, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.

Vishal Gangurde

Mumbai News : न्हावा शेवा बंदरावर सुपारी तस्करीचा पर्दाफाश

न्हावा शेवा बंदरातून ११२ मेट्रिक टन सुपारी जप्त

सुपारी तस्करीचा कस्टम्स कडून पर्दाफाश

पेट्रोलच बायप्रॉडक्ट असलेल्या बीचुमन च्या नावाखाली सुरू होती सुपारीची तस्करी

बिचुमन मध्ये लपवून सुरू होती तस्करी

जप्त करण्यात आलेल्या सुपारीची किंमत ५.७ कोटी रुपये

६.२७ कोटी रुपयांची कर चुकवण्याचा होता प्रयत्न

Rain News : नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नदीला आला पूर

सायंकाळी नगर शहराच्या परिसरात जोरदार पाऊस

छ संभाजी नगर रोडवर असलेल्या जेऊर ससेवाडी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस...

जेऊर गावातून वाहणाऱ्या नदीला पूर.

नदीच्या पाण्यामुळे काही वेळ गावाच्या दोन भागातील संपर्क तुटला

जोरदार पावसामुळे ग्रामस्थांची उडाली तारांबळ...

अनेकांच्या घरांमध्ये घुसले पाणी...

Karan Johar : करण जोहरची मुंबई उच्च न्यायालयात धाव, चित्रपटाविरोधात याचिका दाखल

करण जोहरची मुंबई उच्च न्यायालयात धाव

'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमाविरोधात याचिका

सिनेमाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप

या शुक्रवारी म्हणजे 14 जूनला सिनेमा रीलिज होत असल्याने गुरूवारी तातडीने सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित

करण जोहर या ब्रँडचं आणि त्याच्यासोबत असलेल्या पुण्याईचा गैरवापर होत असल्याचा याचिकेत दावा

सिनेमाचे पोस्टर्स, ट्रेलर्स ब्रँड करण जोहरचं नुकसान आणि बदनामी करत असल्याचा याचिकेतून दावा

सिनेमाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं केलं स्पष्ट

Assembly Session : विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वाची बैठक

विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत शुक्रवारी महत्त्वाची बैठक

विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची 14 जून रोजी संध्याकाळी 4.30 वाजता बैठक

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित राहणार

शुक्रवारी विधान भवनात बैठकीचे आयोजन

Sanjay Raut : न्यायालयीन लढाईत अमोल किर्तीकर यांचा विजय होईल

ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे

मोदी यांचा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पराभव झाला

मशाल आणि धनुष्यबाण घोळ करण्याचा प्रकार सुशिक्षातांनी केला

चिन्ह आत्ता पदवीधरांपर्यंत पोहोचवायला हवं

विधानसभेपूर्वी मशाल चिन्ह घरोघरी पोहचवायाला हवं

अमोल किर्तीकर लढले आणि निष्ठेने लढले

पुढल्या न्यायालयाच्या लढाईत अमोल किर्तीकर यांचा विजय होईल

भाजपच राज्य आल्यापासून भ्रष्टाचाराचं युग निर्माण झालं आहे

Pema Khandu : पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री होणार

पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेश भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

उद्या पेमा खांडू घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपला मिळालं आहे पूर्ण बहुमत

सासऱ्याची २२ कोटींसाठी हत्या प्रकरण, पाचही आरोपींना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज निमजे आणि पायल नागेश्वर या पाच ही आरोपींना कोर्टाने 15 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाची मास्टर माईंड असलेली अर्चना पुट्टेवार जी सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे, तिलाही चौकशीसाठी पोलीस पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपयशानंतर भाजप ऍक्शन मोडवर

राज्यातील पराभूत भाजप खासदारांच्या पराभवाची भाजपकडून समीक्षा सुरू

भाजपच्या केंद्रीय पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याकडून आढावा घेण्याच काम सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी म्हणून आढावा घेण्याचं काम सुरू

पराभवाची नेमकी कारण काय याची उमेदवाराकडून घेतली जातेय माहिती

माजी आमदार नारायणराव मुंडे काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबीत, पक्षविरोधी कारवाया भोवल्या

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने निलंबन करण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील दहशदवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल, विश्वहिंदू परिषदेच आंदोलन

वैष्णोदेवी यात्रेला जाणाऱ्या बसवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेचं नागपूरमध्ये आंदोलन

दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत बडकत चौकात केलं आंदोलन

निवडणुकीच्या काळामध्ये जम्मू-काश्मीरमधील लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं.

हे पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली अस्तित्व दाखवण्यासाठी हा हल्ला केला, मात्र भारत त्याला प्रत्युत्तर देणार

Sharad Pawar : काहीही झालं तरी जमीन कसायची: शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन

पाणी चाऱ्याबाबत आता काही करू शकत नाही. मुबईला गेल्यावर सरकारशी बोलेन. चार महिन्यांनी निवडणुका येतील, आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे. तोपर्यंत काही करू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काहीही झालं तरी शेती कसायची, सोडायची नाही असं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

सोलापुरातील कासेगावमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा शोध अद्यापही सुरू, खासदार प्रणिती शिंदेंनी दिली भेट

सोलापुरातील कासेगाव येथे एक तरुण वाहून गेलेल्या घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदेची भेट

बेपत्ता तरुण ज्ञानेश्वर कदम याचा अद्याप ही शोध सुरूच

सकाळपासून अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरु मात्र पथकाला अद्याप यश नाही

दरम्या पंढरपूरहुन मागवलेली बोट आणि बचाव पथक अद्याप घटनास्थळी पोहोचली नसल्याने आमदार प्रणिती शिंदेचे जिल्हाधिकाऱ्यांना फोन

तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून जाणून घेतली माहिती

Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; मुंबई पोलिसांनी नोंदवला सलमान, अरबाजचा जबाब

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

मुंबई गुन्हे शाखेने नोंदवला सलमानचा जबाब

सलमान सोबत त्याचा भाऊ अरबाज खानचा देखील नोंदवण्यात आला जबाब

लॉरेन्स बिश्नोई गँगने घडवून आणला होता गोळीबार

गोळीबाराप्रकरणी अनेकांना केली आहे गुन्हे शाखेने अटक

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला

अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम 18 जून पर्यंत बाल सुधारगृहातच

बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश उपस्थित नव्हते. त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशनी घेतली सुनावणी

मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल अस म्हणत न्यायालयाने कामकाज केलं स्थगित

अल्पवयीन आरोपी 18 जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : सुनील तटकरेंचा दावा 

काही लोक आमच्या आमदारांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे

आधी सहानुभूति होती हे खरे असले तरी चित्र बदलत असतं

अर्थसंकल्प झाल्यानंतर अजित दादांचाही राज्यव्यापी दौरा होणार आहे

मतदान जसंजसं जवळ येत गेलं तर अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला

Maharashtra Legislative Council Election: नाशिक शिक्षक मतदारसंघातून 15 उमेदवारांची माघार

नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक

शेवटच्या दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघातून 15 उमेदवारांची माघार

15 उमेदवारांच्या माघारीनंतर आता नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Madhu Devlekar : भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन

भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी १० वाजता सांताक्रुज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra Legislative Council Update : नाशिक शिक्षक मतदारसंघात रंगणार तिरंगी लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट

ठाकरे गटाचे संदीप गुळवे विरुद्ध शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत

तर महायुती मधील अजित पवार गटाचे उमेदवार ऍड. महेंद्र भावसार यांनी देखील आपली उमेदवारी ठेवली कायम

भाजप नेते आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांची उमेदवारी महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी

Maharashtra Legislative Council Election:  मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून भाजपची माघार

मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून भाजपने अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरणारे यांची निवडणुकीतून माघार

पक्ष नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर माघारीचा निर्णय झाल्याची बोरणारे यांची माहिती

Maharashtra Legislative Council Update : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी ट्विस्ट, राजेंद्र विखे पाटील यांची अखेरच्या क्षणी माघार

प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून घेण्यात आली माघार

धनराज विसपुते यांचीही माघार

महायुतीत आता केवळ विवेक कोल्हे अजित पवार गटाचे अॅड. महेंद्र भावसार आणि किशोर दराडे मैदानात

महायुतीत आता दोन उमेदवारांचे आव्हान, शिंदे गटाची कोंडी

Raigad Landslide : महाड तालुक्यातील खैरे गावात कोसळली दरड

महाड तालुक्यातील खैरे गावात दरड कोसळली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महाड MIDC तील खैरे गावात ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Maharashtra Legislative Council : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र 

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. तर महायुतीकडून मात्र प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधान परीषदेच्या शिक्षक आणि पदविधर मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

Pune News: पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीची आज बाल सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपणार

पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीची आज बाल सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपणार आहे. ⁠मुलाला बाल सुधारगृहात ठेवायचे की घरी सोडायचे, यावर बाल न्याय मंडळासमोर सुनावणी होणार आहे. पोलीस मुलाला आणखी काही काळ बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Nashik News:  नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून अखेर काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी नाशिक शिक्षक निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटात तडजोड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून आता नाशिक शिक्षक मतदार संघात एकच अधिकृत उमेदवार आहे. ठाकरे गटाचे संदीप गुळवे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Ayodhya Breaking: अयोध्येत दुकान आणि घर तोडल्यानंतर प्रभावित झालेल्या लोकांना बाराशे कोटी रूपयांची मदत जाहीर

अयोध्येतील दुकान आणि घर तोडल्यानंतर प्रभावित झालेल्या लोकांना 1253.06 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अयोध्याचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. अयोद्धेत लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. आहे.

Satara News: जुन्या वादातून एकाला पेट्रोल अंगावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न

साताऱ्यातील पाटखळ येथे जुन्या वादातून एकाला पेट्रोल अंगावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्ती पस्तीस टक्के भाजून जखमी झाली आहे. 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली.

Ahemdnagar Breaking: विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र

विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू आहे. कोल्हेंशी संबंधित संस्थांची 10 दिवसात तिसऱ्यांदा चौकशी होत आहे. राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग तसेच इतर विभागांकडून चौकशी केली जात आहे.

konkan graduates constituency : कोकण पदवधीर मतदारसंघातून शिंदे गटाची माघार

कोकण पदवधीर मतदारसंघातून शिंदे गटाची माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान , गृहमंत्री मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. पंतप्रधान, गृहमंत्री मणिपूरला जाणार का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून २० जागांची मागणी?

राज ठाकरेंची महायुतीकडून २० जागांची मागणी? अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि ठाण्यासहित २० जागांची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे.

Shirur News :  शिरुरमध्ये विजेचा शॉक लागून 9 शेळ्यांचा मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथे विजेचा शॉक लागून नऊ शेळ्यांचा मृत्यू झालाय. मेंढपाळ उत्तम गोडसे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित्रातून विद्युत शॉक खाली उतरून विजेचा धक्का बसला. यात नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला.

चंद्रबाबू नायडू यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायडू यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

चंद्रबाबू नायडू यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ Ajit Pawar Group : अजित पवार गट दुपारी राज्यसभा उमेदवार जाहीर करणार

सुनील तटकरे हे दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

तटकरे या पत्रकार परिषदेत राज्यसभा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे.

Ayodhya News: अयोध्येत एनएसजी हब बनणार

अयोध्येत एनएसजी हब बनणार आहे.दहशतवादाच्या संभाव्य धोक्याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. NSG हबमध्ये चोवीस तास ब्लॅक कॅट कमांडो असणार आहेत. केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Nandurbar Rain : नंदूरबारमध्ये तुफान पाऊस, नदीजवळील लोकांच्या घराचा वीज पुरवठा खंडित

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तुफान पाऊस झाला. विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर वीज पुरवठा खंडित झाला आहे. विजेचे खांब पडल्याने 8 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Sharad Pawar : मोदी गॅरंटी आता चालत नाही; शरद पवारांची टीका

शरद पवार यांच्या पुरंदरमधील भाषणातील मुद्दा

नरेंद्र मोदींची गॅरंटी आता चालत नाही. इंडिया आघाडीने ठरवले आहे की, सर्वांनी एकत्रित जाऊन लोकाच्या सुख दुःखात त्यांना मदत करायची, असे शरद पवार म्हणाले.

Dombivli midc fire : डोंबिवली एमआयडीसीत कारखान्याला आग

डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील Indo Amines कंपनीला आग लागली आहे.

बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीचे अद्याप अस्पष्ट आहे.

अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Politics : आशिष शेलार यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली. मुंबई पदवी आणि शिक्षक मतदारसंघात मनसेने पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीकडूनही मनसेकडे पाठिंब्याची मागणी करण्यात आली आहे. मनसे नक्की कुणाला मदत करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी-खेड अस्तानमधील कोसळलेली दरड हटवण्याचं काम सुरु

रत्नागिरी-खेड अस्तानमधील कोसळलेली दरड हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. काल अस्तानमध्ये दरड कोसळली होती. दरड कोसळल्याने अस्तानकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती.

Mumbai Accident : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, ट्रक चालकाचा मृत्यू

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रॉडने भरलेला ट्रक दुभाजकावर आदळला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रक चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pune Hit and Run Case : ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : मकानदारने मदतीसाठी कोणाच्या सांगण्यावरून डॉ. तावरेला कॉल केला?

ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. 'विशाल ला मदत कर', मकानदारच्या फोनवर आलेला तो कॉल कोणाचा? याचा तपास सुरु झाला आहे. अश्फाक मकानदारने कोणाच्या सांगण्यावरून डॉ तावरेला फोन केला होता, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मकानदार आणि गायकवाड ससून रुग्णालयात कोणाच्या सांगण्यावरून पोहचले याचा देखील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे स्केच जारी, माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचं बक्षीस

जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांपूर्वी रियासी भागात झालेल्या यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्याचा शोध घेण्याची मोहीम सुरूच आहे. रियासी पोलिसांनी दहशतवाद्याचं स्केच जारी केलं. या दहशतवाद्याला माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 20 लाख रूपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारावर हे स्केच तयार करण्यात आलं आहे.

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून आज राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता

प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीतील एका गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी सुरु आहे. पार्थ पवार यांनीही कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतली. आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT