Breaking : नारायण ईंगळे अनाथ आरक्षणाचा पहिला अधिकारी SaamTv
महाराष्ट्र

Breaking : नारायण ईंगळे अनाथ आरक्षणाचा पहिला अधिकारी

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाल्याने नारायण इंगळे या तरुणाला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ आरक्षणातून झालेला नारायण हा पहिला अधिकारी असून त्याला शुभेच्छा देत, त्याचे मी खूप खूप अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा :

अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण ठेवण्यात यावा यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा करून आरक्षण मिळवले होते. आरक्षणाचा लाभ मिळाल्याने नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी म्हणून रुजू होता येणार आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत श्रीमती ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले.

तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली. यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. तर नारायण इंगळे यांनी अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाल्याबद्दल महिला बालविकास विभाग आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

SCROLL FOR NEXT