Breaking : अकोल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलले; शिवसेनेचा पराभव अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

Breaking : अकोल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलले; शिवसेनेचा पराभव

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी (MLC Election Result) आज सकाळपासून सुरु झाली असून यामध्ये अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातील निकाल जाहीर झाले आहेत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी (MLC Election Result) आज सकाळपासून सुरु झाली होती यामध्ये अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे (Shivsena) गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे (BJP) वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. भाजपचे वसंत खंडेलवाल यांना 438 मते तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मते मिळाली आहेत.

तर दुसरीकडे आज नागपूरमध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे य़ांचा देखील विजय झाला असून अपक्ष आणि काँग्रेसने समर्थन दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.

नागपूरात काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. आणि अवेळी केलेल्या याच राजकीय कुरघोडीमुळे विजयाची माळ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यामध्ये पडली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT