गोपीचंद पडळकर Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणूकीचा गुन्हा!

आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; झरे येथील शेतकऱ्याची फसवणूक...

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या आटपाडी येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर (Brahmdev Padalkar) यांच्यावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. विकलेल्या शेत जमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे  यांनी दिली आहे. एलसीबीसह आटपाडी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी अकरा एक शेत जमीन सन 2008 मध्ये दहा लाख पन्नास हजार रुपयाचा तोंडी व्यवहार ठरवला होता. यावेळी पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक लाख रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त २१ मार्च २०११ रोजी झाला. त्यावेळी ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे स्टॅम्प ड्युटी फी कमी करण्याचे भासवून खरेदी दस्त करते वेळी फक्त चार लाख 75 हजार रुपये दिले.

असे एकूण सदर कुटुंबाला पाच लाख 75 हजार रुपये पडळकर बंधूंनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार दहा लाख पन्नास हजार रुपयाला ठरला होता. पडळकर बंधु त्यांना चार लाख 75 हजार रुपये देणार होते. ते आज अखेर त्यांना दिलेले नाहीत. या उलट त्यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर चालू ठेवला आहे. अखेर या कुटुंबाने पोलिसांच्याकडे (police) धाव घेऊन पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी (Atpadi) पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kobi Matar Bhaji Recipe : कोबीच्या भाजीला द्या मसालेदार ट्विस्ट, बनवा ढाबा स्टाइल कोबी मटर मसाला

Maharashtra News Live Update: साताऱ्यातील कण्हेरचे चारही दरवाजे उघड

Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

Arrested : राजकारणात मोठी खळबळ! 'त्या' पक्षाच्या प्रमुखाला मध्यरात्री अटक; 'हे' ठरलं कारण

Silver Coin Benefits : पिठाच्या डब्यात १ चांदीचे नाणे का ठेवावे? फायदे वाचून आजच कराल 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT