Breaking: सरपंचाला हाताशी धरून प्राध्यापकांनी लाटली 102 एकर जमीन! विनोद जिरे
महाराष्ट्र

Breaking: सरपंचाला हाताशी धरून प्राध्यापकांनी लाटली 102 एकर जमीन!

आष्टी मतदार संघाचे भाजपचे माजी आ.भीमसेन धोंडे, यांच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी, सरपंचाला हाताशी धरून तब्बल 102 एकर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विनोद जिरे

बीड : आष्टी मतदार संघाचे भाजपचे माजी आ.भीमसेन धोंडे, यांच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी, सरपंचाला हाताशी धरून तब्बल 102 एकर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन प्राध्यापकांसह चार जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या रुई नालकोल येथील, शेख महंमदबाबा यांची 102 एकर इनामी जमीन, खोटे दस्तावेज तयार करून बळकावल्या प्रकरणी, चार व्यक्ती व खोटी साक्ष दिलेले दोन जण अश्या सहा व्यक्तींवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना, मध्यरात्री 1 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापक व एक प्राध्यापक पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याऐवजी, चक्क इनामी जमिनी प्राध्यापक बळकायला लागल्याने, शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या खोट्या दस्त ऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल, सरपंच-रुई नालकोल ता.आष्टी व शरद नानाभाऊ पवार, रा.रुई नालकोल ता.आष्टी, यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. तर, अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

तर, सुरेश बोडखे हे आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक आहेत. हे माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या संस्थेतील सर्व कर्मचारी असल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात जवळपास 27 हजार एक्कर इनामी जमीन आहे. मात्र मस्जिद, दर्गा, मंदिर व इतर देवस्थानच्या इनामी जमिनीचे बनावट दस्त ऐवज तयार करून, खरेदी विक्री सुरू आहे. यामुळं जिल्ह्यातील इनामी जमिनी लुटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: काँग्रेस वर्किंग कमिटीची राज्यातील पराभवावर बैठक होणार

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

SCROLL FOR NEXT