Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मणिपूरमध्ये मोदींच्या 'मन की बात'ला विरोध, लोकांनी रेडिओ फोडले; राऊंतांनी VIDEO ट्वीट करत डिवचलं

Ruchika Jadhav

Manipur Clashes: गेल्या ९ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून जनेतशी संवाद साधत आहेत. अशात मणिपूरमध्ये त्यांच्या या कार्यक्रमाचा रेडिओ फोडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. (Latest Marathi News)

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे. रविवारी इंफाळ पश्चिम जिल्ह्यांतर्गत इंडो-बर्मा रोड येथे नागरिकांनी एकत्र येत पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा निषेध केला. रस्त्यावर उतरुण नागरिकांनी रेडिओ फोडत घोषणाबाजी केली. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही मौन बाळगून आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मनातील राग व्यक्त करत काल आंदोलन केलं आहे.

देवेंद्र जी, हे खरे आहे.....?

मणिपूरमध्ये मन की बातचा विरोध करत रेडिओ फोडण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ संजय राऊतांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच देवेंद्र जी, हे खरे आहे.....? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राऊतांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ अॅड. आनंद दास यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की. "मणिपूरच्या जनतेने नरेंद्र मोदींच्या "मन की बात" चं स्वागत खूपच वेगळ्या पद्धतीने केल आहे. आपण नक्की पहा. यातून एकच सिद्ध होतंय की देशाला मन की बात करणारा नाही तर जन की बात करणाऱ्या "राहुल गांधी" ची गरज आहे."

दरम्यान, मणिपूरमध्ये (Manipur) मैती समाजाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली. याच्या निषेधार्थ 3 मे रोजी इंफाळ खोऱ्यात आदिवासी समाजाने मोर्चा काढला होता. यानंतर मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्याचसोबत जाळपोळ देखील करण्यात आली. हिंसाचार आणखीन भडकत चालला असून वातावरण चिघळलं आहे. असे असूनही मोदींनी यावर मौन बाळगल्यानं नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT