Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: अब तक ५६..फसवणूक करणाऱ्या तोतयास केली अटक

अब तक ५६..फसवणूक करणाऱ्या तोतयास केली अटक

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

बोरिवली : नागरिकांशी सोशल मिडीयाच्‍या माध्यमातून ओळख वाढवून आर्मी कॅन्टीनमधील वस्तू स्वस्तात देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या तसेच बेरोजगार तरुणांना आर्मी, नेव्हित जॉब देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. या कथित आर्मी ऑफिसरला (Mumbai) मुंबईच्या बोरीवली पोलीस (Police) ठाण्यातील सायबर गुन्हे तपास अधिकाऱ्याने अटक केली आहे. विनोद गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला नवी मुंबई येथून अटक केली आहे. (Breaking Marathi News)

बोरिवली पोलीस ठाण्यात १२ एप्रिलला एका तरुणाने सोशल माध्यमावर ओळख झालेल्या व स्वतःची ओळख नेव्ही अधिकारी अशी दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन आला होता. या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार सोशल माध्यम फेसबुकद्वारे ओळख झालेल्या व्यक्तीने आपले नाव दीपक सुर्वे असे दाखवले होते. त्याने आपण आर्मी अधिकारी असल्याचे सांगितल्यामुळे त्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी मैत्री केली.

आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्तात देण्याचे त्याने कबूल केल्यामुळे त्याला गुगल पे द्वारा पैसे पाठविले. मात्र कोणतीही वस्तू मिळाली नाही ना पैसे पुन्हा मिळाले. म्हणून फसवणूक झाल्याची बाब समजतात तक्रार दिली. या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन वपोनी निनाद सावंत, पीआय विजय माडये, तपास अधिकारी कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांची टीम गुन्हेगाराच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.

५६ पेक्षा अधिक लोकांना फसवणूक

फिर्यादीने आरोपीचा दिलेला मोबाईल नंबर बंद असल्यामुळे आरोपीचा माग काढण्यास उशीर झाला. तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपी नवी मुंबई परिसरात असल्याचे समजताच आरोपीला ताब्यात घेऊन बोरवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याने वेगवेगळ्या नावाने फेसबुकवर अकाउंट तयार करून तोपर्यंत ५६ पेक्षा अधिक लोकांना मिलिटरी कॅन्टीनमधील वस्तू स्वस्तात देण्याच्या नावावर असलेल्या शिवाय मिलिटरी नोकरी देण्यात दाखवूनही अनेक तरुणांकडून पैसे उकळण्याचे कबुल केले. आरोपींकडून बनावट आर्मी आणि एअर फोर्स नेव्ही, सीआयएसएफ जवानाचे ओळखपत्र आणि १२ वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड आणि २ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashomati Thakur : मला ब्लॅक करतोय, २५ लाखांची मागणी; यशोमती ठाकूरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर खळबळजनक आरोप

Delhi Politics : दिल्लीत 'आप'ला मोठा झटका; बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

VIDEO : हेमंत पाटील-प्रताप पाटील चिखलीकर मनोमिलनाचा महायुतीला फायदा?

SCROLL FOR NEXT