Badlapur minor school girl abuse Saam Tv
महाराष्ट्र

Badlapur School Case : बदलापुर अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल, आज सकाळी होणार तातडीची सुनावणी

Bombay High Court urgent hearing held today : मुंबई उच्च न्यायालयाने बदलापुर प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. आज याप्रकरणी तातडीची सुनावणी होणार आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

बदलापूर अत्याचार प्रकरणात महत्वाचं अपडेट आहे. आता या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतलीय. बदलापुर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका करून दाखल घेतली आहे. आज २२ ऑगस्ट रोजी सकाळी तातडीची सुनावणी होणार आहे.

नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर

बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी आज न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार (Bombay High Court) आहे. बदलापुरमधील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने अखेर दखल घेतलीय. त्यामुळेच याप्रकरणी तातडीने सुनावणी होतेय.

मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल

बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेतील दोन साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली (Badlapur News) होती. वास्तविक ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी दिरंगाई केल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु मुंबई हायकोर्टाने तातडीने सुनावणी होणार असल्याचं जाहीर (Badlapur latest news) केलंय. आज होणाऱ्या या सुनावणीकडे बदलापुरकरांसह सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज नेमकं सुनावणीत काय होतं? हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरण

बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारोंच्या संख्येने जमाव २० ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरला होता. उड्डाणपूलावरी वाहतूक बंद करत आंदोलकांनी रेल रोको देखील केला (Badlapur minor school girl abuse case) होता. आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली जात होती. घटनेनंतर शाळा प्रशासनाने माफी मागितल्याचं देखील समोर आलंय. आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय. आरोपी शाळेत साफ-सफाईचे काम करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT