Bombay High Court restricts powers of gram panchayat administrators amid governance controversy. saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat: ग्रामपंचायत प्रशासकांना आर्थिक निर्णय घेण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा सरकारला दणका

Gram Panchayat Sarpanch Administrators : मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर निर्बंध घातले आहेत. या आदेशाचा महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार ५०० ग्रामपंचायतींवर परिणाम होणार आहे.

Bharat Jadhav

  • ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय

  • प्रशासकांच्या मोठ्या आर्थिक निर्णयांवर तात्पुरते निर्बंध लागू

  • मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या तब्बल १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला. यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत मावळत्या माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केलं. परंतु उच्च न्यायालयानं मात्र या निर्णयावरून सरकारला दणका दिलाय.

गाव पातळीपर्यंत सर्वांना खूश ठेवण्याचे काम महायुती सरकारने केले होते. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई असेल असा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

हा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे व मा.न्यायमूर्ती अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने दिला. राज्य सरकारने जानेवारी २०२६ मध्ये राज्यातील सुमारे १४ हजार ५०० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी संपल्याने त्या ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाला पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी या निर्णया विरोधात माजी सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासंबंधी शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले. अशा प्रशासकांकडून मोठे आर्थिक निर्णय घेणे, विकास कामांना मंजुरी देणे, निविदा काढणे तसेच धोरणात्मक निर्णय घेणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला,या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या आदेशाचा महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार ५०० ग्रामपंचायतींवर परिणाम होणार असून प्रशासकांच्या मोठ्या आर्थिक निर्णयांवर तात्पुरते निर्बंध लागू झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT