Aurangabad Saam
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बस्फोटाची धमकी; संशयाची सुई दुसऱ्या राज्यात | Aurangabad

Bomb blast threat to Aurangabad bench of Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आज दुपारी १२ वाजता बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.

Bhagyashree Kamble

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठाला ऑफिशियल ई मेल आयडीवर बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा ई मेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजता हा धमकीचा ई मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ई मेल मिळताच पोलस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, तत्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धमकीचा ई-मेल चेन्नई येथून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हा धमकीचा ई मेल नेमका कुणी पाठवला? याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

दुपारी धमकीचा ई मेल प्राप्त

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आज दुपारी १२ वाजता बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. थेट खंडपीठाच्या ई-मेल आयडीवरच हा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खंडपीठ प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रत्येकाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

चेन्नईहून ई-मेल पाठवण्याचा संशय

चौकशीत हा धमकीचा ई मेल चेन्नई येथून पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात हा ई मेल नेमकं कुणी पाठवला? तसेच का पाठवला? याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे यांनी हायकोर्टात येऊन पाहणी केली.

परिसराची तपासणी सुरू

बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या चार पथकांसह एटीएसचे पथकही खंडपीठात दाखल झाले असून, संपूर्ण परिसराची तपासणी सुरू आहे.या धमकीनंतरही खंडपीठाचे कामकाज नियमित सुरू आहे. ज्यांना न्यायालयात हजर राहायचे आहे, त्यांना मुभा दिलेली आहे. कोणताही गोंधळ उडाला नसल्याचे चित्र आहे. मात्र सुरक्षेस्तव कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

SCROLL FOR NEXT