A farmer from Akola shows barren fields after sowing bogus seeds; agriculture officers conduct field inspection. saam tv
महाराष्ट्र

Saam Impact: बोगस बियाण्यांचे बळी, बियाणे कंपनीचा शेतकऱ्याला गंडा 'साम'च्या बातमीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा

Seed Scam Exposed: अकोल्यातील शेतकऱ्याला बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे. सोयाबीन आणि तुरीचं बियाणं उगवलं नाही. साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामा सुरू केला असून कारवाईची मागणी होत आहे.

Omkar Sonawane

समाधानकारक पाऊस पडला... त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पातुरच्या शेतकऱ्याने कर्ज काढून 'सारस 335' या कंपनीचं सोयाबीन आणि तुरीचं बियाणं खरेदी केलं...त्याची पेरणी केली... मात्र पंधरवडा उलटला तरी सोयाबीन आणि तुरीचं बियाणं उगवलंच नाही...याच बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठा

बोगस बियाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे... कारण शेतकऱ्याने पेरणीसाठी सावकाराकडून पैशांची जुळवाजुळव केल्याचं समोर आलंय...साम टीव्हीने शेतकऱ्यांची कैफीयत महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर प्रशासनाला जाग आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर धाव घेत पंचनामा सुरु केलाय...

एकीकडे आसमानी संकटं पाठ सोडत नाहीत.. तर दुसरीकडे कंपनीने सुलतानी पद्धतीने बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलंय. फक्त अकोला जिल्हाच नाही तर धाराशिवसह राज्यभरात अनेक ठिकाणी कंपन्यांकडून बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांना गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे... अन्यथा बळीराजा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून उध्वस्त होऊ शकतो....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT