डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी थाटला बोगस दवाखाना, नागपूरमध्ये मोठा खुलासा. Google
महाराष्ट्र

Nagpur Crime : डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगी अन् मुलाचा प्रताप, बोगस दवाखाना सुरु ठेवत रुग्णांची फसवणूक

Nagpur News: नागपूरमधील अन्सारनगरमध्ये डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी बोगस दवाखाना सुरु केला होता. याचा खुलासा होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस दवाखान्यासंर्भात मोठा खुलासा झाला आहे. डॉक्टर वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांनी बोगस दवाखाना सुरूच ठेवल्याचे समोर आले आहे. नागपूर शहरातील अन्सारनगर मधील हे प्रकरण असून प्रकरणाचा खुलासा होताच सर्वत्र खळबळ उडाली.

नागपूर शहरातील अन्सारनगर परिसरात डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवत होते. मात्र, दीड वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर, त्यांचा 23 वर्षीय मुलगा जैद अन्सारीने कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेता हे क्लिनिक सुरू ठेवले. या बोगस दवाखान्यात ते दोन शिफ्टमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असता, या क्लिनिकमध्ये बीपी मशीन, औषधे, इंजेक्शन, सलाईन आणि इतर वैद्यकीय साहित्य आढळून आले.

मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कृत्यावर वैद्यकीय क्षेत्रातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्रात याधीही असे अनेक बोगस दवाखाने असल्याचे समोर आले आहे. देवासमान मानणाऱ्या डॉक्टरांनीच रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला आहे का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT