Kolkata Doctor Case : कोलकाताच्या 'निर्भया'ला न्याय मिळाला, आरोपी संजय रॉयला जन्मठेप

Kolkata RG Kar Doctor Case : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला होता. तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Kolkata RG Kar Doctor Case
Kolkata RG Kar Doctor CaseSaam Tv
Published On

Kolkata RG Kar Doctor Case : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला होता. त्यानंतर तिची हत्यादेखील करण्यात आली होती. कोलकातातील या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला शनिवारी (१८ जानेवारी) कोर्टाने दोषी ठरवले होते. आज सोमवारी (२० जानेवारी) संजय रॉयला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या सियालदह कोर्टाने आज सोमवारी (१८ जानेवारी) कोलकाता डॉक्टर अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल सुनावला. आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम ६४, ६६, १०३/ १ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता. पीडित डॉक्टर आरजी कर मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमधील सेमिनार रुममध्ये आराम करत होती. तेव्हा आरोपी रुममध्ये घुसला आणि त्याने डॉक्टरवर हल्ला करत लैगिंक अत्याचार केला. पुढे त्याने महिला डॉक्टरची निघृण हत्या केली.

या प्रकरणी आरोपी संजय रॉयला कोर्टाने दोषी मानत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. कोर्टाने आज दुपारी २.४५ वाजता प्रकरणाचा निकाल सुनावला. सियालदह कोर्टाने संजय रॉयवर ५०,००० रुपयांचा दंड देखील ठोठावला. कोर्टाचे मुख्य न्यायाधीश अनिर्बन दास यांनी प्रसंगी भाष्य केले. 'पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जावी, तसेच नुकसानभरपाईसह अतिरिक्त ७ लाख रुपये देखील द्यावे,' असे दास यांनी म्हटले.

Kolkata RG Kar Doctor Case
Rajasthan Wedding: चेहरा पाहून लग्नाला नकार, रागाच्या भरात होणार्‍या नवऱ्याची मिशीच कापली

कोर्टात संजय रॉयने मी निर्दोष असून मला फसवलं जात आहे असा दावा केला होता. या प्रकरणात आणखी लोक सामील असल्याचे पीडित डॉक्टरच्या पालकांनी म्हटले आहे. अन्य आरोपींनाही अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांनी विनंती केली आहे. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Kolkata RG Kar Doctor Case
सरकारी नोकरी लागताच बायकोचा रुबाब वाढला; म्हणाली, तुझी लायकीच नाही, सोबत राहायचं असेल तर १ कोटी दे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com