अवैध गर्भपात करणाऱ्या खऱ्या डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक ! गजानन भोयर
महाराष्ट्र

अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक !

वाशिम शहरात अवैध गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक आरोग्य विभाग व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

गजानन भोयर

वाशिम : वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरात अवैध गर्भपात करण्यापूर्वी एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकाने व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत डॉ. एस.एम.सारसकर या डॉक्टरसह विलास ठाकरे या बोगस डॉक्टर ला अटक केली आहे. वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस.एम.सारसकर नामक दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नबंरवर मिळाली होती.

हे देखील पहा -

या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग व पोलिसांनी सापळा रचून छापा मारून, या दवाखान्याची झडती घेतली असता त्यामध्ये गर्भपात करण्याच्या औषधीचा साठा आणि अन्य साहित्य मिळून आले. सदर साहित्य जप्त करून आरोपी डॉ.सारसकरसह विलास ठाकरे बोगस डॉक्टरलाही अटक करून वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या दोन्ही डॉक्टरांविरोधात विविध कलमान्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं तिला त्रास वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून तिचा शास्त्रीय पद्धतीने गर्भपात करण्यात आला आहे. सध्या त्या महिलेची प्रकृति चांगली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्तिसक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KUMBH MELA 2027: कुंभमेळ्याच्या आडून भाजपची नवी खेळी? शिखर समितीची स्थापना, कोणत्या मंत्र्याना मिळाले स्थान?

KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? यंदा ठाकरे बंधूंचा करिष्मा चालणार का?

Pimpri-Chinchwad Koita Gang: पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन घरफोड्या करून दागिने लंपास

Maharashtra Live News Update: हत्येच्या आरोपीची नंदूरबार पोलिसांनी काढली शहरातून धिंड

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

SCROLL FOR NEXT