MNC Election Saam Tv
महाराष्ट्र

MNC Election: संजय राऊतांची फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज, नेमकं कारण काय? | VIDEO

MNC Election Sanjay Raut Challenge Devendra Fadnavis: दोन दिवसात महापालिका निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहत आहोत. अशातच संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसोबत ११ लाखांची पैज लावली आहे.

Suprim Maskar

मुंबई महापालिका निवडणुकीत भाषिक, धार्मिक धुव्रीकरणाला सुरुवात झालीय.अशातच संजय राऊतांनी फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज लावलीय. ही पैज नेमकी कशासाठी लावण्यात आली? फडणवीसांनी काय उत्तर दिलं? ते जाणून घ्या.

मनपा निवडणुकीत लाखाची पैज

मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावरूव उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.. यावेळी फडणवीसांनी ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलल्यास चक्क बक्षीस देण्याचं जाहीर केलं. अशातच एक हजार रुपयांपासून सुरु झालेली ही पैज आता 11 लाखांच्या बक्षीसावर पोहचलीय... हिंदू–मुस्लीम मुद्द्यांचा आधार न घेता भाजपनं एखादी निवडणूक लढवून दाखवावी आणि 11 लाख रुपये घेऊन जावेत, असं आव्हानं संजय राऊतांनी दिलीय...

दरम्यान, याआधी फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनीही 1 लाखांच्या बक्षीसाचा आकडा जाहीर केला होता. विकासाच्याऐवजी भाजप धार्मिक तेढ निर्माण करण्यातच धन्यता मानत असल्याची टीका ठाकरेंनी केलीये.

मुंबईतील राजकारणामध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांशिवाय मुंबई महापालिकेत विजयाचं गणित आखणं राजकीय पक्षांपुढेचं मोठं आव्हान ठरणार आहे...

मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 20 टक्क्यांच्या आसपास आहे. महानगरपालिकेमधील 227 जागांपैकी सुमारे 45 जागांवर मुस्लीम मतदार उमेदवारांचा जय- पराजय निश्चित करतात. त्यापैकी 30 ठिकाणी मुस्लीमांची मते निर्णायक आहे...2017 ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 31 मुस्लीम नगरसेवक निवडून आले होते. यंदाही 68 मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत...

त्यामुळे मतदानाला चार दिवस शिल्लक असताना धार्मिक धुव्रीकरणातून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेल्या या पैजेत कोण जिंकणार हे मतदारच ठरवणार आहेत. विकासाच्या मुद्द्याला बगल देऊन धार्मिक, भाषिक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मतदार कशी चपराक लगावतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT