Chandrakant Patil  Saam Tv
महाराष्ट्र

''निवडणुकीत Paytm च्या माध्यमातून पैसे वाटण्याचा प्रयत्न; ED कडे तक्रार करणार''

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ सरकारवर आरोप

संभाजी थोरात

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीला आम्ही विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. पेटीएमच्या (Paytm) माध्यमातून पैसे वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. 1 हजार रुपये जरी अशा पद्धतीने वाटले तर ईडीची (ED) कारवाई होईल, नागरिकांना आवाहन करतो की एक हजारासाठी नको ते शुक्लकाष्ठ मागे लावून घेऊ नका. आजच याबाबत ईडीकडे तक्रार केली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा वापर निवडणुकीसाठी केला जातो, हे आम्ही सहन करणार नाही.

हे देखील पहा-

राज ठाकरे साहेब यांची प्रतिक्रिया म्हणजे सर्वसामान्य हिंदू नागरिकाची भूमिका होय. हिंदूंना हिंदू म्हणून घेताना कमी वाटते. हिंदू धर्मामध्येच सर्वधर्मसमभाव आहे. राज ठाकरेसाहेब यांचे भाषण एकूण काल बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. आमच्याबरोबर आणखी कुणी तरी महाविकास आघाडी सरकारवर बोलत आहेत हे काल दिसले. जातीय तेढ वाढण्याच्या भीतीनं हिंदू दाबला गेला. सगळा विचार केवळ हिंदूंनी केला पाहिजे का? हा देश हिंदूंचा आहे. याठिकाणी नंतर मुस्लिम आले, पण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हिंदूंनी कधी दुसऱ्या देशात जाऊन आक्रमण केले का? मुस्लिमांनी सगळीकडे आक्रमण केले. मुस्लिमांनी मूर्ती आणि महिलांना भ्रष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत आहे. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा सगळं झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक विषयाला ब्राम्हण आणि इतर यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विखे- पाटील किंवा थोरात कुटुंबाने जातीचे राजकारण केले नाही. माझ्यावर टीका करण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्य घरातील मुलगा मोठा होतो हे त्यांना सहन होत नाही. सतेज पाटील, हसन मुश्रीफ तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे एकटे कार्यकर्ते आहे बाकी सगळे नेते आहे. पवार साहेब या वयात देखील संपूर्ण राज्यभर फिरतात हा चांगला गुण त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT