नाशिकच्या पालिका स्वच्छतागृहाच्या खोलीत काळ्या जादुचा प्रकार - अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिकच्या पालिका स्वच्छतागृहाच्या खोलीत काळ्या जादुचा प्रकार

नाशिकमध्ये पालिका स्वच्छतागृहाच्या एका खोलीत 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा, पूजेच साहित्य, काळ्या कोंबड्या आणि अन्य संशयास्पद साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकमध्ये Nashik पालिका स्वच्छतागृहाच्या एका खोलीत 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा Counterfeit Notes, पूजेचे साहित्य, काळ्या कोंबड्या आणि अन्य संशयास्पद साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सिडको CIDCO परिसरातल्या महापालिकेच्या पवननगर मैदानावरील स्वच्छता गृहावरील खोलीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Black Magic in Nashik Corporations Toilet

या खोलीत 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा, पूजेचं साहित्य, काळ्या कोंबड्या, अंडे, माळा, कपडे आणि अन्य संशयास्पद वस्तू पूजाविधीप्रमाणे रचून ठेवण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी एक वयस्कर जोडपं राहत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे जोडपं फरार झाले आहे. त्यामुळे पोलिसांचाही संशय बळावला आहे.

तर या ठिकाणी काळ्या जादूच्या माध्यमातून गैरप्रकार केले जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यान शहरामध्येच अशा पद्धतीने काळ्या जादूसारखा संशयित प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकाराची चौकशी करत असून हा प्रकार नेमका काय आहे आणि फरार झालेले जोडपे इथून नेमका का पळून गेले, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT