धुळे महानगरपालिकेत उपमहापौर पदासाठी भाजपचा एकमेव अर्ज भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळे महानगरपालिकेत उपमहापौर पदासाठी भाजपचा एकमेव अर्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Municipal Corporation) उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक प्रक्रिया (Election) पार पडत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची अखेरची मुदत होती. धुळे महानगरपालिकेवर नगरसेवकांचा संख्येच्या बळावर भाजपकडे धुळे महानगर पालिकेची (BJP) सत्ता असून आज देखील उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी यांचा एकमेव अर्ज उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे दाखल करण्यात आल्यामुळे उपमहापौरपदी हिरामण गवळी यांची वर्णी निश्चित मानले जात आहे.

धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत आहे. महापौरपदाच्या आरक्षणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर 12 जुलैला कामकाज होणार आहे. त्यामुळे महापौरपद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता असेल. मात्र, उपमहापौरपदाची निवडप्रक्रिया सोमवार दिनांक 28 जून पार पडणार आहे.

यामध्ये एकूण 74 पैकी भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी 14, एम आय एम 2, समाजवादी पार्टी 2, बसपा 1, अपक्ष 2, लोकसंग्राम 1 नगरसेवक असून लोकसंग्रामच्या एकमेव नगरसेविका हेमा गोटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. संख्याबळ बघता व भाजपने एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळे भाजपतर्फे उपमहापौरपदी हिरामण गवळी यांचा विजय जवळपास निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT