रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!
रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन! SaamTV
महाराष्ट्र

रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन!

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Medical College रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपने आज जोरदार आंदोलन केले. चंद्रपूर महानगर भाजपने BJPया आंदोलनाद्वारे रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत आवाज उठवला. या महाविद्यालय रुग्णालयात तज्ञ व ज्युनियर डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहेत ती सर्व पदे भरावी तसेच सर्वसामान्यासांठी सर्व उपचार वेळात व्हावे ते करताना नागरिकांना कोणत्याही अडीअडचणी येवू नयेत अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. BJP's agitation against hospital inconveniences

हे देखील पहा-

दरम्यान नुकतेच एका अतिदुर्गम भागातून आलेल्या 17 वर्षीय मुलीचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाला होता. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने मात्र या आजारी मुलीला उशिराच आणले गेल्याचा दावा केला होता. मात्र कधीही अवेळी जरी एखाद्या व्यक्तीवरती कोणता प्रसंग उद्धभवला तरी त्यांच्यावरती सर्व उपचार वेळेत व्हायला पाहिजेत हिच सर्वसामान्य जनतेची मागणी असते.

दरम्यान अवाढव्य पसरलेल्या औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यात मात्र गरीबांच्या सोयीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील या गोंधळाच्या स्थितीवर भाजपने संताप व्यक्त केला आहे तातडीने असुविधा दूर करण्याची मागणी भाजपने या आंदोलनाद्वारे केली आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT