आमदारांच्या निलंबनानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको भूषण अहिरे
महाराष्ट्र

आमदारांच्या निलंबनानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको

विधानसभेमध्ये आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी काही काळ रास्ता रोको केला.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: विधानसभेमध्ये आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर Mumbai-Agra highway नगाव परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. BJP workers block the Mumbai-Agra highway after the suspension of MLAs

विधानसभेमध्ये गैरकृत्य केल्याचा आरोप लावत अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे. याबाबत भाजपतर्फे ठाकरे सरकार Thackrey विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

आपला संताप व्यक्त करण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील नागाव परिसरामध्ये ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत रास्तारोको केला. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचा आवाज दाबण्यासाठी सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप करीत महा विकास आघाडी सरकारचा निषेध तीव्र शब्दांमध्ये व्यक्त केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT