Kolhapur firing, BJP worker shot 
महाराष्ट्र

BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

Kolhapur News: कोल्हापुरात भरदिवसा भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ते गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर | साम टीव्ही

BJP worker Suraj Sakhare shot : कोल्हापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका भाजप कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात सुरज साखरे नावाचा भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला खासगी सावकारीच्या वादातून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापुरात भरदिवसा भाजप कार्यकर्ता सुरज साखरे याच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप वैद्यकीय सूत्रांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, या गोळीबारामागे खासगी सावकारीचा वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसानी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT