Wrestlers Protest Saam Tv
महाराष्ट्र

Pritam Munde On Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन भाजपच्या महिला खासदारचा मोदी सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या - 'सरकारने खेळाडूंशी...'

Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंग (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या महिनाभरापासून दिल्लीमध्ये (Delhi) कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे.

Priya More

Beed News: दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनावरुन (Wrestlers Protest) भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी मोदी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. या मुद्द्याबाबत प्रीतम मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'या प्रकरणात खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणीच गेले नाही, ही खेदाची बाब आहे.', असे मत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या महिनाभरापासून दिल्लीमध्ये (Delhi) कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे.

बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, 'खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही. ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता.' तसंच, 'केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती.', असे त्यांनी सांगितले.

'या प्रकरणातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी' असे स्पष्ट मत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात लैगिंक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई करुन त्यांना अटक करण्यात यावे अशी मागणी करत कुस्तीपटुंनी दिल्लीत आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आला तरी देखील अद्याप ब्रिजभूषण यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन (Wrestlers Protest) मागे घेणार नाही असा पवित्रा या आंदोलक कुस्तीपटुंनी घेतला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर 28 एप्रिलला संध्याकाळी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी कुस्तीपटुंनी त्यांना मिळालेल मेडल गंगा नदीमध्ये विसर्जित करु असा इशारा दिला होता. अशामध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांनी या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. 'माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी घेईन, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज दुपारी दरे गावात जाणार

Nashik Crime : हाणामारीत जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

Oil India Recruitment: ऑइल इंडियामध्ये सरकारी नोकरीची संधी अन् १.६० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Video Viral: मुंबईकर धन्यवाद!, कामाला जाणाऱ्या तरूणाचं 'ते' कृत्य पाहून मराठा आंदोलनकांनी केलं तोंडभरून कौतुक, VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates : अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांचा जरांगेंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

SCROLL FOR NEXT