Devendra Fadnavis yandex
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातही भाजपचं धक्कातंत्र? पुन्हा फडणवीस येणार की दुसरं कुणी?

Devendra Fadnavis News: महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Saam Tv

भरत मोहळकर-

महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालंय.. मात्र या घटनेला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण गेल्या काही वर्षातला इतर राज्यांचा इतिहास पाहिला तर ही मालिका कशी सुरू झाली ते पाहूयात...

पहिला धक्का

2017 मधील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला पहिलांदा स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर केशव प्रसाद मौर्य आणि मनोज सिन्हांसारखे दिग्गज स्पर्धेत होते. त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी 9 दिवसांचा वेळ घेतला. आणि भाजपने कट्टर हिंदुत्ववादी खासदार योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपदी बसवून धक्कातंत्राचा वापर केला.

दुसरा धक्का

2023 मध्ये मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्यावेळी शिवराजसिंह चौहान सरकारने आणलेल्या लाडली बहीण योजनेमुळे भाजपला मोठं यश मिळालं. मात्र 8 दिवसांचा वेळ घेत भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरून चर्चेत नसलेल्या मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली..

तिसरा धक्का

2023 मध्येच राजस्थानमध्ये झालेल्या निवडणुकीत वसुंधराराजे आणि गजेंद्र सिंह शेखावत यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजपने 9 दिवसांच्या चर्चेनंतर धक्कातंत्र वापरून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री बनवलं.

चौथा धक्का

2023 मध्ये झालेल्या ओडिशातील विजयानंतर धर्मेंद्र प्रधान, मनमोहन सांबल यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजपनं धक्कातंत्र वापरून ओडिशात मोहन मांझी यांच्यासारख्या चर्चेत नसलेल्या नावावर शिक्कामार्तब केलं.. यावेळीही भाजपला मुख्यमंत्री ठरवायला तब्बल ८ दिवस लागली.

खरं पाहिलं तर भाजपनं धक्कातंत्राची सुरूवात महाराष्ट्रातूनच केली होती. २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवारांसारख्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारून कोणताही मंत्रिपदाचा अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करून धक्का दिला होता. आता १० वर्षांनंतर महाराष्ट्रात भाजप पुन्हा धक्कातंत्राचा वापर करणार की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT