Kolhapur Election Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Election: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

भाजपच्या उमेदवाराची घोषणा आज शुक्रवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करणार आहेत.

संभाजी थोरात

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. या मतदार संघात भाजप (BJP), महाविकास आघाडीची उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपकडून आज उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. भाजपकडून सत्यजित कदम (Satyjit Kadam) यांच्या नावावर एकमत झाले आहे.

पोट निवडणुकीची (Election) तारीख जाहीर झाली आहे. 12 एप्रिलला मतदान होणार आहे. 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपच्या (BJP) उमेदवाराची घोषणा आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करणार आहेत. भाजपचे सत्यजित कदम यांच्या नावावर एकमत झाले आहे. सत्यजित कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahaderao Mahadik) यांचे भाचे आहेत.

निवडणूक चुरशीची होणार

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातील काँग्रेसकडून (Congress) ही जागा बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. या जागेसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे निश्चित केले आहे.

या जागेसाठी काँग्रेस (Congress) विरुध्द भाजप अशी थेट लढत होणार आहे. काँग्रेस उमेदवाराला आव्हान देण्यासाठी भाजपने (BJP) फिल्डिंग लावली आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children's Health: शाळा सुरू होताच मुलांच्या आरोग्याचा धोका वाढला; तज्ज्ञांनी पालकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Bus Accident: भीषण अपघात! बस खोल दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी

Maharashtra Government : राज्य सरकारचा मोठा निर्णय, शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' विकण्यावर बंदी, कारणही सांगितलं

'नजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे समजेल का तुला काही...' मिथालाचं सौंदर्य जबरदस्त

Maharashtra News Live Update: गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

SCROLL FOR NEXT