BJP 
महाराष्ट्र

नगराध्यक्षा अपात्र; राष्ट्रवादीच्या गाेटात आनंद, भाजपला धक्का

ओंकार कदम

सातारा : वाई पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यांच्यावर राज्य शासनाने अपत्रातेची कारवाई केली आहे. सन २०१७ मध्ये ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीला अटक झाली हाेती. त्यानंतर वेळाेवेळी याबाबत सुनावणी झाली. त्यातून शासनाने नगराध्यक्षा डाॅ. शिंदे prathibha shinde यांनी पदावरुन बाजूला केल्याचा निर्णय दिला.

नगराध्यक्षा डाॅ. प्रतिभा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षातून bjp थेट नगराध्यक्षपदासाठीची निवडणुक लढविली हाेती. त्या निवडून आल्यानंतर वाईतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ncp गटास धक्का बसला हाेता. त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आनंदाचे वातारवण पसरले आहे.

डाॅ. प्रतिभा शिंदे यांनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदारास 14 हजार रुपयांची लाच मगितल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घेतला हाेता. दरम्यानच्या काळात पालिकेतील नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा अशी मागणी राज्य शासनाकडे केली हाेती.

त्यानूसार दाेन वेळा सुनावणी झाली. शासनाने डाॅ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने सातारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या डॉ. प्रतिभा शिंदे यांना या पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणुक लढवता येणार नाही असेही शासनाने दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.

वाई पालिका पक्षीय संख्या बळ

एकूण सदस्य : 20

राष्ट्रवादी काॅंग्रेस : 14

काँग्रेस : 06

नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे (जनतेतून थेट निवड) : भाजप

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT