Sambhajinagar Shivsena vs BJP Rada Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar Rada : ठाकरेंचा ढाण्या वाघ भाजपला एकटाच नडला, अंबादास दानवेंचा रुद्रावतार, पाहा VIDEO

Sambhajinagar Shivsena vs BJP Rada : भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना घेराव घातला. पण अंबादास दानवे यांनी न जुमानता भाजप कार्यकर्त्यांना जशाच तसं उत्तर दिलं.

Satish Daud

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला भाजपने विरोध केलाय. आदित्य ठाकरे रामा हॉटेलमध्ये थांबले असताना भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देत हॉटेलसमोर गोंधळ घातला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोधक करत "उद्धव ठाकरे जिंदाबाद"च्या घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

घोषणाबाजी करत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना घेराव घातला. पण अंबादास दानवे यांनी न जुमानता भाजप कार्यकर्त्यांना जशाच तसं उत्तर दिलं. यावेळी अंबादास दानवे भाजप कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. या संपूर्ण राड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचा ढाण्या वाघ एकटा भाजपला नडला, अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील झालेल्या वादानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आंदोलन करण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण कुणाच्या घरासमोर आंदोलन करायचे नसते. आंदोलनाच्या जागा ठरलेल्या आहेत. भाजप व्यक्तिगत हेतूने आंदोलन करीत होते म्हणून शिवसैनिक पुढे आले. कालचं आमचं आंदोलन देखील नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नव्हतं. देशातील क्रिया-प्रतिक्रियावर आम्ही आंदोलन केलं, असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, दोन्ही गटातील वाद मिटवताना आणि जमावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जमध्ये दोन्ही गटातील काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी काहींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT