BJP and Shinde Sena leaders intensify political strategies as internal competition within MahaYuti heats up ahead of 2029 elections. saam tv
महाराष्ट्र

महायुतीत 'चेकमेट'चं राजकारण, 2029 साठी आत्तापासूनच शह-काटशह

BJP vs Shinde Sena 2029 Maharashtra Election Strategy: महायुतीत 2029 च्या निवडणुकीआधीच चेकमेटचं राजकारण सुरू झालं आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील वाढता संघर्ष, पक्षप्रवेश आणि बालेकिल्ल्यांवरची लढाई यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत.

Suprim Maskar

2029 च्या विधानसभेसाठी स्वबळाचा नारा देत अमित शाहांनी केलेले हे विधान आता पुन्हा एकदा चर्चेत आलयं... आणि त्याला कारण ठरलयं...भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिंदेसेनेनं आखलेली रणनीती....सातारा जिल्हा परिषदेवरून शिंदेसेना आणि भाजपात झालेल्या राड्यानंतर महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं...अशातच भाजपला चेकमेट देण्यासाठी शिंदेसेनेनं भाजपच्या बालेकिल्ल्यापासूनच सुरुवात केलीय..ती कशी पाहूयात...

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार समाधान अवताडेंविरोधात शिंदेसेनेनं भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा पक्षप्रवेश करून घेत मोठं आव्हान उभं केलयं... नाशिकमध्ये भाजपच्या सीमा हिरेंविरोधात शिंदेसेनेनं अजय बोरस्तेंचा शिंदेसेनेत पक्षप्रवेश करून भाजपच्या बालेकिल्ल्यात समांतर ताकद निर्माण केलीय..पालघर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद असताना शिंदेसेनेनं जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन स्वतंत्र फळी उभी केलीय..

दुसरीकडे भाजपनंही शिंदेसेनेला शह देण्यासाठी कन्नड, सातारा, बोईसर आणि पालघर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश करून घेतला...त्यामुळे 2029 ला जागावाटपात आपलं पारडं जड राहावं यासाठी दोन्ही पक्षांकडून आत्तापासूनच चांगलीच मोर्चेबांधणी केली जातेय. मात्र एकीकडे चेकमेटच्या चर्चा रंगलेल्या असताना 2029 ला महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं विधान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केलं जातयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer death: सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूला हार्ट अटॅक; 39 व्या वर्षी झालं निधन

अपघातग्रस्तांना वाचवायला पळाला अन् दुसऱ्या बसने उडवला, टोलनाका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Maharashtra News Live Update: पेट्रोल,डिझेल दरात गेली दहा दिवसात सलग चौथ्यांदा वाढ,सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला काञी

Ladki Bahin Yojana: मे महिना संपत आला, लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT