BJP celebrates yet another unopposed victory in Dhule Municipal Corporation ahead of polling. Saam Tv
महाराष्ट्र

भाजपचा विजयरथ सुसाट! मतदानाआधीच आणखी एका महापालिकेत पारडं झालं जड, नेमकं काय राजकारण घडलं?

BJP Unopposed Victory In Dhule Municipal Corporation: धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजयाचा रथ सुसाट सुरू आहे. मतदानाआधीच भाजपचा आणखी एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला असून शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

Omkar Sonawane

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाने आपली पकड अधिक मजबूत केली असून, पक्षाची बिनविरोध विजयाची घोडदौड सातत्याने सुरूच आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 'ब' मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सुरेखा चंद्रकांत उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उगले यांचा विजय सुकर झाला आहे.

भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी साम टिव्हीशी बोलतांना काल पहिला उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर "आगे आगे देखो होता हे क्या" असे सूचक वक्तव्य केल होतं. त्याप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी धुळ्यात भाजपचे तिसरे उमेदवार बिनविरोध झाले आहे. निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने मिळवलेले हे यश विरोधकांसाठी मोठा धक्का मानले जात असून, शहराच्या राजकीय वर्तुळात या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे.

अर्ज दाखल करून 24 तासांत धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवड झाले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही बिनविरोध झालेले नगरसेवक हे दुसऱ्या पक्षातून भाजपात आयत करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही नगरसेवकांचा दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला होता आणि हे दोन्ही बिनविरोध झालेले नगरसेवक या महिला आहेत.

धुळे महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आणि या दरम्यान जवळपास विद्यमान 32 नगरसेवकांना तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवारांना भाजपतर्फे उमेदवारी देखील देण्यात आली. यामध्ये बहुतांश उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत.

अशातच आज पुन्हा आणखी एक नगरसेवक बिनविरोध निवडणून आल्याने भाजपचा विजयाचा रथ सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि आता धुळे या महापालिकांमध्ये भाजपने खाते उघडले असून मतदानाआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

Bullet Train launch date : भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; तारीख केली जाहीर, ५ टप्पेही सांगितले

निवडणुकीच्या आखाड्यात बाप-लेक एकमेकांच्या विरोधात; शिंदेसेना-ठाकरेसेनेत काँटे की टक्कर|VIDEO

Ratnagiri Tourism : कोकणातील धबधब्याचे अद्भुत सौंदर्य, थंडगार पाण्याखाली भिजायला 'या' ठिकाणी कधीही जा

SCROLL FOR NEXT