CM Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Sunil Kedar resigns from BJP during Nashik ZP elections: नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला

  • महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवरून पक्षात अंतर्गत नाराजी उफाळली

  • ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली. बड्या नेत्याने भाजपचा साथ सोडली. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. सुनील केदार यांनी ऐन निवडणुकीत पक्षाची साथ सोडल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महापौरपदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचे नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

तसंच, काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील प्रस्ताव दिला होता. याच प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. याच सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदार यांनी प्रदेश कामिटीला आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज करण्याची देखील सुनील केदारे माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात बनवा अळूच्या पानांची कुरकुरीत वडी; एकदा खाल तर खातच राहाल

Cinnamon Water Benefits: सकाळची सुरुवात करा दालचिनीच्या पाण्याने; रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला मिळतील हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: धुळ्यात वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

Worli Fort : मुंबईत असूनही पर्यटकांच्या नजरेआड राहिला वरळीचा किल्ला, 'या' गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या आहात का?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी; नियम मोडाल तर खबरदार

SCROLL FOR NEXT