BJP Leader Nayakvadi Shifts to Ajit Pawar’s NCP Ahead of Elections Saam
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का; बड्या नेत्यानं सोडली कमळाची साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

BJP Leader Nayakvadi Shifts to Ajit Pawar’s NCP Ahead of Elections: कराडच्या घोगावात भाजपला मोठा धक्का. उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश.

Bhagyashree Kamble

  • कराडमध्ये भाजपला धक्का.

  • मोहनराव नायकवडी यांनी भाजपची सोडली साथ.

  • राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही महिने शिल्लक आहेत. लवकरच या निवडणुका पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच कराडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि उद्योजक मोहनराव नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.

कराड घोगाव येथील भाजप नेते आणि उद्योजक मोहनराव नायकवडी यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहनराव नायकवडी यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. नायकवडी यांनी काही कार्यकर्त्यांसह हाती घड्याळ बांधलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोहनराव नायकवडी यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मोहनराव नायकवडी यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. राजसभेचे खासदार नितीन पाटील आणि ऍड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. तसेच कराडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

विरारमध्ये धावत्य़ा ट्रॅकने घेतला पेट

विरार पूर्वेच्या शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर धावत्या ट्रॅकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ट्रॅक जळून खाक झाले आहे. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ट्रॅकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. विरार पूर्वेच्या शीरसाड- वज्रेश्वरी रस्त्यावरून ट्रॅक वज्रेश्वरीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान शिरवली पुनिकपाडा येथे पोहचताच धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक थांबविला. मात्र तेवढ्यात आगीने अधिकच पेट घेतल्याने ट्रक आगीच्या विळख्यात सापडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

Maharashtra Live News Update : दिवाळीच्या गर्दीत हरवला चिमुकला, पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत शोधला

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?

Kartiki Ekadashi : विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; कार्तिकी एकादशीची तयारी, विठ्ठलाचे राजोपचार झाले बंद

SCROLL FOR NEXT