BJP Avadhut Wagh On Mahatma Gandhi
BJP Avadhut Wagh On Mahatma Gandhi  Saam TV
महाराष्ट्र

BJP News : गांधीजींना ब्रिटीशांकडून दरमहा १०० रुपये पेन्शन?; भाजप नेत्याचा जावईशोध!

साम टिव्ही ब्युरो

Avadhut Wagh On Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांना ब्रिटीश सरकार दरमहा शंभर रुपये पेन्शन देत असल्याचा जावईशोध भाजपचे (BJP) प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लावला आहे. तशा आशयाचं ट्विट सुद्धा वाघ यांनी केलं आहे. 'आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) देखील ब्रिटिश सरकार दरमहा 100 रुपये द्यायची', असं अवधूत वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे गांधीवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

काय म्हणाले अवधूत वाघ?

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केलंय. यामध्ये त्यांनी महात्मा गांधी यांना ब्रिटीश सरकार दरमहा शंभर रुपये पेन्शन देत असल्याचं म्हटलं आहे. 'आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना देखील ब्रिटिश सरकार दरमहा 100 रुपये द्यायची. त्यावेळी सोने 18 रुपये तोळा होते. म्हणजे तत्कालीन 100 रुपये आजच्या 275000 रुपया समान होते, पण मी याला पेंशन म्हणणार नाही. सावरकरांच्या 60 रुपयांच्या मानाने 66% जास्त रक्कम आहे ही', अशा आशयाचं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे.

दरम्यान, अवधूत वाघ यांनी केलेल्या या ट्विटनंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वभंर चौधरी यांनी वाघ यांच्यावर टीका केली आहे. 'हा संपूर्णपणे खोटेपणा आहे, 1925 पासूनचा राष्ट्रीय स्वयसेवक संघाचा हा खोटारडेपणाचा अजेंडा आहे, तोच अवधूत वाघ हे पुढे नेत आहेत'. असं म्हणत चौधरी यांनी वाघ यांच्यावर टीका केलीय.

'वास्ताविक इंग्रजांच्या काळात आणि आज सुद्धा जेलमध्ये सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली जाते, त्यावेळी तिथे काम करावं लागतं. त्या काम करण्याचे पैसे प्रत्येक कैद्याला आजही मिळतात. महात्मा गांधी यांनाही ते मिळाले होते. याला वेगळ्या स्वरूपात दाखवणं, आकडेवारी खोटी देणं असा हा प्रकार आहे', असं विश्वभर चौधरी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, अवधूत वाघ यांनी केलेले हे आरोप सिद्ध करून दाखवावे असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT