Dasara Melava : मुंबईत कार्यकर्त्यांना डासही चावणार नाही; अब्दुल सत्तार काय म्हणाले, वाचा...

२५ हजारांहून अधिक कार्यकर्ते मुंबईला घेऊन जाणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
Abdul Sattar On Dasara Melava
Abdul Sattar On Dasara MelavaSaam Tv

Abdul Sattar On Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आता अवघे काही तासचं शिल्लक उरले आहेत. मेळाव्यासाठी (Dasara Melava) गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात शर्यत लागली आहे. राज्यभरातून दोन्ही गटांचे समर्थक मुंबईकडे निघाले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघातून ५०० बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. (Shivsena Dasara Melava News)

Abdul Sattar On Dasara Melava
Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाकडून 'ती' मागणी मान्य

या बसेसमधून २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते (Maharashtra News) मुंबईला घेऊन जाणार असल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 'मुंबईकडे प्रवास करताना कार्यकर्त्यांना प्रवासात कुठलाही त्रास होणार नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत कार्यकर्त्यांना डासही चावणार नाही', असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. (Abdul Sattar News Today)

काय म्हणाले अब्दुल सत्तार पाहा संपूर्ण व्हिडीओ

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क तर शिंदे गटाला बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. अशातच आपल्याच मेळाव्याला जास्त गर्दी जमावी यासाठी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार शर्यत सुरू आहे.

लहान-मोठ्या अशा एकूण १० हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यात कुणाची तोफ कुणावर धडाडणार? याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com