'' आम्ही राजकीय दृष्ट्या वेगळे झालो असलो तरी आमच्यातील वैचारिक दृष्ट्या हिंदूत्तवाचं नातं कायम आहे,'' अशा शब्दातं शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भाजपामधील (BJP) नात्याबाबत भाष्य केलं आहे. राजकारण चांगल्या भाषेत आणि चांगल्या हेतूने करायला पाहिजे. भाजपाने संबंध सुधारण्यासाठी एका महान माणसाला नेमले आहे. मात्र भाजपामध्ये बाहेरुन आलेले लोक शिवसेनेवर टिका करतात. भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर असे नेते कधीही शिवसेनेवर अशा भाषेत टिका करणार नाही, भाजपा शिवसेनेत कधीही एकमेकांवर धावून जाण्याचा प्रसंग आला नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
हे देखील पहा-
गेल्या तीन-चार दिवसांत केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि मुख्यमंत्रई उद्धव ठाकरे यांच्यात झाच्यातील संघर्षामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. राणे समर्थक आणि मुख्यमंत्री ठाकरे समर्थकांमध्ये ठिकठिकाणी राडा झाला. या संघर्षात नाशिक शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केली. त्यांच्यावर नाशिक पोलीसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवक संजय राऊत यांना भेटायला आले होते. त्यांच्या भेटीनंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
जनआशिर्वाद यात्रेचा हेतू-
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनआशिर्वाद यात्रेचा हेतूही स्पष्ट केला. केंद्र सरकारने देशातील जनतेसाठी ज्या योजना राबवल्या आहेत, केंद्रसरकार देशातील जनतेसाठी काय काम करते आहे. नव्या केंद्रीय मंत्र्यांकडून सरकारच्या कार्यक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ही जन आशिर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला सांगितले नाही. याचा अर्थ असा होतो की, ते पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. असही त्यांनी म्हटले आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.