BJP and Shinde Sena leaders in a heated discussion over the Mumbai mayor post ahead of elections. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महापौरपदावरुन रस्सीखेच, महापौर कुणाचा? भाजप, शिंदेसेनेत जुंपली

BJP-Shinde Sena Clash Sparks: पालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिंदेसेनेत महापौरपदावरुन वादाची ठिणगी पडलीय...मात्र, महायुतीत मुंबई महापौरपदावरुन कसा वाद रंगलाय आणि त्यावरुन विरोधकांनी कसं तोंडसुख घेतलंय...

Bharat Mohalkar

फोडाफोडीच्या राजकारणानंतर भाजप आणि शिंदेसेनेत मुंबईच्या महापौरपदावरुन जुंपलीय... दुसऱ्याची पोरं नाही तर स्वतःचं पोर कडेवर घेणार असल्याचं वक्तव्य करुन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबईत भाजपचाच महापौर बनवणार असल्याचं वक्तव्य केलंय...त्यावरुन शिंदेसेनेनंही महायुती झाली नाही तरी आमचाच महापौर होणार, असा निर्धार केलाय..

महापौरपदावरुन भाजप आणि शिंदेसेना आमने-सामने आल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... त्यामुळे विरोधकांनी महापौरपदाच्या वादात उडी घेतलीय.. तर दिल्लीच्या आकाने भाजपचा महापौर करण्याचे आदेश दिल्याचा खोचक टोला काँग्रेसनं लगावलाय..मात्र ठाकरेसेनेनं मात्र भाजपचा दावाच खोडून काढलाय..

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष पेटला... तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे आगीत तेल ओतलं गेलं... आता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असतानाच महापौरपदावरुन नव्या वादाला तोंड फुटलंय... . त्यामुळे मुंबईच्या महापौरपदावरुन पेटलेला वाद मिटणार की या वादामुळे महायुती तुटणार? याची उत्सुकता आहे. मात्र निवडणुकीआधीच महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने त्याचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनीही वज्रमुठ आवळली आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात कोणाचा लाभ होणार ? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

Sohail Khan: सलमानच्या भावाने हेल्मेट न घालता चालवली बाईक; VIDEO शुट करताच घातली शिवी, आता मागितली माफी

New Railway Station: पश्चिम रेल्वेला मिळणार आणखी एक स्टेशन! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT