नगरपरीषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली.यामागे होतं ते फोडाफोडीचं राजकारण....भाजपने कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गडाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. या पक्ष प्रवेशावरुन नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे तक्रार केली होती. मात्र या फोडाफोडीनंतर आणि तणातणीनंतर यापुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला आहे.
महायुतीतील नाराजी कमी करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. महायुतीतील नेता-कार्यकर्त्यांची फोडाफोड थांबवण्यालाठी प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची 2-3 दिवसात बैठक होणार आहे.
विरोधकांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यास काही हरकत नाही. मात्र भाजपने शिंदेसेना किंवा राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही. त्याच प्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनीही भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचे नाही असं ठरलं आहे. यावर आगामी बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, बुलडाणा इथं तर भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली. शिंदे सेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना लक्ष्य केलं तर चव्हाणांनीही २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असं म्हणत तलवार उपसलेली .महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याने आणि याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याच्या शक्यतेने निवडणुकीच्या युद्धापूर्वी प्रवेशबंदीचा तह करण्यात आलाय. आता या तहातल्या अटीशर्तीनुसार मित्रपक्ष वागणार का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.