Manoj Jarange Patil Saam TV News
महाराष्ट्र

मुंबईत मनोज जरांगे दाखल होण्याआधीच भाजपकडून बॅनरबाजी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो अन्.. नेमकं काय लिहिलंय?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मोठं आंदोलन करणार आहेत. ते २९ ऑगस्टपासून उपोषणालाही बसणार आहेत. आंदोलनापूर्वी भाजपने मुंबईत बॅनरबाजी केली आहे.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मोठं आंदोलन करणार आहेत.

  • ते २९ ऑगस्टपासून उपोषणालाही बसणार आहेत.

  • आंदोलनापूर्वी भाजपने मुंबईत बॅनरबाजी केली आहे.

  • देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याचा उल्लेख या बॅनरवर आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रवाना झाले आहेत. पाटील आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला आपल्या मराठा बांधवांसह आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. तसेच स्वत: उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, आंदोलनापूर्वी मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचण्यापूर्वी भाजपने बॅनरबाजी केली आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह आझाद मैदानावर धडकण्यापूर्वी भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. त्यांनी बॅनरवरून जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचं छायाचित्र दिसून येत आहे.

तसेच 'इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो', असं बॅनरवर लिहिलेलं दिसून येत आहे. यासह ' मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस', असंही बॅनरवर लिहिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. 'उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे नेते देवेंद्र फडणवीस', असं म्हणत भाजपनं मुंबईतील काही ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी बॅनरबाजी केली आहे.

मनोज जरांगेंचं पारनेरमध्ये जंगी स्वागत

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील निघाले होते. आता ते शिवनेरीवर दाखल झाले आहेत. रात्री २ वाजेच्या दरम्यान, मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं, यासाठी त्यांनी आंदोलन छेडलं. २९ ऑगस्ट रोजी ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

India Sets New Tax Record: भारताचा नवा रेकॉर्ड! कंपन्यांपेक्षा जनतेनं भरला जास्त टॅक्स

SCROLL FOR NEXT