bjp protest on rahul gandhi remark on narendra modi saam tv
महाराष्ट्र

Bjp Protest : धुळे, सातारा, परभणी, नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राहूल गांधींविराेधात आंदाेलन

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदाेलन छेडले.

Siddharth Latkar

- ओंकार कदम / राजेश काटकर / संजय सूर्यवंशी / भूषण अहिरे

Bjp News :

काँग्रेस नेते राहुल गांधी (congress leader rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) आणि ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा दावा करत आज (शुक्रवार) भाजपने धुळे, सातारा, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यात राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा (bjp protest on rahul gandhi remark on narendra modi) आंदाेलन करुन निषेध नाेंदविला . विविध ठिकाणच्या आंदाेलनात भाजप नेते, कार्यकर्ते यांनी राहूल गांधी यांच्या प्रतिमेस जाेडाे मारले.

साता-यात भाजपचे आंदाेलन

सातारा शहरातील पोवई नाका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी बेताल वक्तव्य केल्याचा दावा करीत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आणि फोटोचे दहन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिका-यांनी राहुल गांधींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

परभणीत भाजप माेर्चाचे आंदाेलन

परभणी शहरात भाजप मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी जोडे मारत आंदोलन छेडले. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेडला भाजपा ओबीसी आघाडीची निदर्शने

नांदेडच्या वजिराबाद चौकात भाजपाने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. या आंदोलनात भाजपा ओबीसी आघाडी आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धुळ्यात झाशीची राणी चौकात आंदाेलन

धुळे शहरात धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्यावतीने राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढण्यात आली, शहरातील झाशीची राणी चौक परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे, यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT