सुशांत सावंत
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. दादर येथे नाना पटोले यांच्या विरोधात भाजप नेते प्रसाद लाड यांनी आंदोलन केलं. नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने 'गोमूत्र पाज' आंदोलन केलं. यावेळी नाना पटोले यांच्या फोटोला भाजपने गोमूत्र पाजलं आहे (BJP Protest Against Nana Patole Led By Prasad Lad).
आम्ही नानाला पवित्र करण्याचा प्रयत्न केला - प्रसाद लाड
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चमच्याचा निषेध करणाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत. ज्यांनी पंतप्रधान यांचा अपमान केला, त्याच्या प्रतिमेला आम्ही गोमूत्र पाजत आहोत आणि शुद्ध करत आहोत. आज आम्ही नानांना पवित्र करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आमच्या कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, अस प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले.
आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत. नाना पटोले (Nana Patole) या गुन्हेगारावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. नाना पटोले याची लायकी देखील नाही. गावगुंड स्वतःच नानाला शिव्या देतो, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंवर ताशेरे ओढले.
नाना पटोले काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ परत एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी परत एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता-जाता परत एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद क्षणाचा देखील वाट न बघता, त्यात परत एकदा एक काडी टाकली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.