satara bjp president dhairyasheel kadam criticizes manoj jarange patil saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil महाविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला बदनाम करताहेत : धैर्यशील कदम (पाहा व्हिडिओ)

देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे असा आराेप सातारा भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मनाेज जरांगे पाटील यांच्यावर सातारा येथे केला.

ओंकार कदम

Satara News :

महविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला आणि नेत्यांना बदनाम करण्याचे काम मनाेज जरांगे- पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांच्याकडून सुरू असल्याचा आराेप भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम (dhairyasheel kadam) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला. साम टीव्हीशी बाेलताना कदम यांनी महाविकास आघाडीवर (mahavikas aghadi) देखील टीका केली. (Maharashtra News)

भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण (maratha reservation) मिळवून दिलं. ते उच्च न्यायालयात टिकवलं. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात ते टिकलं नाही. दुर्दैवाने महविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले हे कुठेही नमूद केले जात नाही असेही कदम यांनी म्हटले.

आगामी काळात निवडणुका आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. महविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला आणि नेत्यांना बदनाम करण्याचे काम जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे आणि हा प्रकार निंदनीय आहे असेही धैर्यशील कदम यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT