BJP Political News Saam tv
महाराष्ट्र

BJP Politics: भाजपच्या मतांची बेरीज वाढणार? आगामी निवडणुकीसाठी आखली नवी रणनीती

ओबीसी समाजातील नेत्यांची जुळवाजुळव भाजपनं सुरू केली आहे. ओबीसी नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा भाजपनं सुरू केला आहे.

संजय डाफ

Nagpur News : भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजातील नेत्यांची जुळवाजुळव भाजपनं सुरू केली आहे. ओबीसी नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा भाजपनं सुरू केला आहे. आशिष देशमुख, अशोक जीवतोडे या ओबीसी नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं आहे. यानंतर आणखी ओबीसी नेत्यांच्या भाजप संपर्कात असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

भाजप आतापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. 'घर चलो अभियान', मोदी@9, 'वन बुथ 20 युथ'या माध्यमातून भाजपनं लोकांशी संपर्क वाढविला आहे.

दलित आणि मुस्लिम मतदार भाजपच्या काहीसा दूर आहे. त्यामुळं हक्काचा मतदार असलेला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ओबीसी नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटाच सुरू केला आहे.

नागपुरातील माजी आमदार आशिष देशमुख, चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजपनं पक्ष प्रवेश करून घेतला. इतर पक्षातील ओबीसी नेत्यांना भाजपने संपर्क केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर टीका करत राजकीय विश्वासार्हता गमावलेल्या नेत्यांना भाजप प्रवेश देत असून याचा त्यांना काहीही फायदा होणार नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी म्हटलं आहे.

विरोधक टीका करत असले तरी ओबीसी नेते आल्यानं भाजप मतांची टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. कारण ओबीसी मतांची टक्केवारी सर्वाधिक आहे. प्रत्येक नेत्यांची काही प्रमाणात का असेना स्वतःची व्होट बँक असते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव केल्यावर भाजपच्या मतांची बेरीज नक्कीच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

Maharashtra Live News Update : बांबूच्या जोडीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट....

SCROLL FOR NEXT