Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा; भाजपचे राष्ट्रवादीला खुले आव्हान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्तेत येऊ देणार नाही, असा निर्धार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळींना दिला. या मुद्द्यावरून आता भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्याला भाजपकडून (BJP) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपने ट्विट करत शरद पवारांच्या वक्तव्यला प्रतिउत्तर दिलं आहे.

हे देखील पहा -

आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा असं आव्हान भाजपानं शरद पवारांना दिलं आहे.

दरम्यान, भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांना राज्यातील तीन प्रलंबित प्रश्नांबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. आदरणीय पवार साहेब, जी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा! राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत. मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा. असं भाजपाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

SCROLL FOR NEXT