Kolhapur Love Jihad Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात लव्ह जिहाद? नितेश राणेंचा गंभीर आरोप, अल्पवयीन मुलगी १६ दिवसांपासून बेपत्ता

आज भाजप नेते नितेश राणे यांनी कोल्हापुरात येऊन लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा देखील काढला.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News : कोल्हापुरात (Kolhapur) लव्ह जिहादवरून वातावरण चांगलचं तापलं आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने यामागे लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. आज भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापुरात येऊन लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा देखील काढला. (Kolhapur Love Jihad News)

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते नितेश राणे यांच्या विरोधात मोठ्या संख्येने जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर जमा झाले आहे. यावेळी आमदार नितेश राणे प्रचंड आक्रमक झाले होते. मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जिवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, असं नितेश राणे म्हणाले.

आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही, असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. (Nitesh Rane News Today)

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदरील मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेला १६ दिवस उलटले आहेत. मात्र तिचा अद्याप शोध लागलेला नाही.

दरम्यान, मुलीचे नातेवाई आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना सदर प्रकरणात दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा राज्यभरात सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आज कोल्हापुरात जन आक्रोश आंदोलन करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT