Vinod Tawde new BJP national responsibility Saam TV
महाराष्ट्र

भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; तावडे, पवार अन् गांधींवर सर्वात मोठी जबाबदारी

BJP new national executive : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विनोद तावडे, पीयूष गोयल, भारती पवार आणि प्रीती गांधी यांना महत्त्वाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Vinod Tawde new BJP national responsibility : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या नव्या केंद्रीय पदाधिकारी व विविध विभागांच्या संयोजकांची यादी आज अधिकृतपणे जाहीर केली. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. (BJP Announces New National Executive: Vinod Tawde, Piyush Goyal, Bharti Pawar and Preeti Gandhi Get Key Responsibilities)

राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सोशल मीडिया सह-संयोजक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर राज्यातील नेत्यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे, पीयूष गोयल, भारती पवार आणि प्रीती गांधींवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. (BJP chief Nitin Nibin announces names of new office bearers)

महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची यादी आणि जबाबदाऱ्या :

पक्षाच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची (National Treasurer) महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संघटन पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीसपदी निवड झाली आहे.

पक्षाचा डिजिटल आणि सोशल मीडिया विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सह-संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या कार्यकरणीत कोण कोणत्या नेत्यांवर जबाबदारी?

राष्ट्रीय उपाध्यक्ष (National Vice Presidents)

  • वसुंधरा राजे सिंधिया - राजस्थान

  • तीरथ सिंह रावत - उत्तराखंड

  • राम माधव - दिल्ली

  • बैजयंत जय पांडा - ओडिशा

  • डी. पुरंदेश्वरी - आंध्र प्रदेश

  • रेखा वर्मा - उत्तर प्रदेश

  • वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी - गुजरात

  • (डॉ.) भारती प्रवीण पवार - महाराष्ट्र

  • सरदार मनप्रीत सिंह बादल - पंजाब

  • लाल सिंह आर्य - मध्य प्रदेश

  • प्रो. एम. नागराज - कर्नाटक

  • प्रो. तारिक मन्सूर - उत्तर प्रदेश

  • (डॉ.) मधुचंद्रा कर - पश्चिम बंगाल

राष्ट्रीय संघटन सरचिटणीस (National General Secretary - Org.)

बी. एल. संतोष - दिल्ली

राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीस (National Joint General Secretaries - Org.)

  • शिवप्रकाश - मुंबई

  • सौदान सिंह - चंदीगड

राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretaries)

  • विनोद तावडे - महाराष्ट्र

  • सुनील बन्सल - दिल्ली

  • बिप्लब कुमार देब - त्रिपुरा

  • स्मृती इराणी - उत्तर प्रदेश

  • डॉ. सतीश पुनिया - राजस्थान

  • गजेंद्र पटेल - मध्य प्रदेश

  • हरिश द्विवेदी - उत्तर प्रदेश

  • संजय भाटिया - हरियाणा

राष्ट्रीय सचिव (National Secretaries)

  • कविता पाटीदार - मध्य प्रदेश

  • के. सुरेंद्रन - केरळ

  • डॉ. भोला सिंह - उत्तर प्रदेश

  • डॉ. प्रदिप वर्मा - झारखंड

  • जगदीश ईश्वरभाई पटेल - गुजरात

  • डॉ. संदीप पाठक - दिल्ली

  • फांगनॉन कोन्याक - नागालँड

  • संगीता यादव - उत्तर प्रदेश

  • अनिल अँटोनी - केरळ

  • डॉ. एम. व्यंकटेशन - तमिळनाडू

  • मनोज तिग्गा - पश्चिम बंगाल

  • सिद्धार्थ शंभू - बिहार

  • डॉ. स्वदेश सिंह - दिल्ली

  • म्रिगांका देव बर्मन - आसाम

  • रोहन गुप्ता - गुजरात

  • जय प्रकाश - दिल्ली

राष्ट्रीय कोषाध्यक्ष (National Treasurer)

पीयूष गोयल - महाराष्ट्र

राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष (National Joint Treasurer)

राजेश मंगल - राजस्थान

केन्द्रीय कार्यालय प्रभारी (Central Office In-charge)

तरुण चुग - पंजाब

केन्द्रीय कार्यालय सचिव (Central Office Secretary)

महेंद्र पांडे - उत्तराखंड

ईशान्य संयोजक (North-East Coordinator)

डॉ. संबित पात्रा - ओडिशा

ईशान्य सह-संयोजक (North-East Joint Coordinator)

राजीव बब्बर - दिल्ली

सर्व सेलचे संयोजक (All Cells Coordinator)

विष्णु दत्त शर्मा - मध्य प्रदेश

सर्व सेलचे सह-संयोजक (All Cells Joint Coordinators)

  • ऋतुराज सिन्हा - बिहार

  • विष्णु वर्धन रेड्डी - आंध्र प्रदेश

मीडिया संयोजक (Media Convenor)

अनिल बलोनी - उत्तराखंड

मीडिया सह-संयोजक (Media Co-Convenors)

  • आशिष उषा अग्रवाल - मध्य प्रदेश

  • प्रदीप भंडारी - दिल्ली

  • सिद्धार्थ यादव - दिल्ली

सोशल मीडिया संयोजक (Social Media Convenor)

  • दीपक म्हस्के - छत्तीसगड

सोशल मीडिया सह-संयोजक (Social Media Co-Convenors)

  • प्रीती गांधी - महाराष्ट्र

  • शिवानंद द्विवेदी - दिल्ली

  • आलोक भट्ट - उत्तराखंड

  • अरुण यादव - हरियाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपने भाकरी फिरवली, नव्या कार्यकारिणीची घोषणा; संपूर्ण यादी एका क्लिकवर

Heart Attack Symptoms : २० - ३० वयातच दिसू लागली आहेत, हॉर्ट अटॅकची ही लक्षणे, या संकेताकडे दुर्लक्ष करू नका

उपवासाला कोणती फळे खावी, कोणती खाऊ नये? वाचा संपूर्ण लिस्ट

Maharashtra News Live Update: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचं उपजिल्हा रुग्णालय पाडणार, स्थानिकांची मात्र नाराजी

Shubman Gill catch: शुभमन गिलचा 'सुपरमॅन कॅच' पाहिलात का? तुम्हीही व्हाल हैराण, पाहा Video

SCROLL FOR NEXT