Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

'राज्यात येत्या दोन तीन दिवसात भाजपचे सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील'

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड महाराष्ट्रातसह देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. अशातच भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. तसेच ते आषाढी एकादशी निमित्त पंढपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करतील असं चिखलीकर यांनी म्हटलं आहे. (Devendra Fadnavis Latest News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंड सुरूच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे आसाम मधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून बसले आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असल्याचं शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच प्रताप पाटील चिखलीकर यांनी येत्या दोन ते तीन दिवसांता राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाची पूजा करतील असं विधान केलं आहे.

इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमदारांबरोबरच शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान चिखलीकर यांनी केलेल्या या विधानाने राज्यात भाजपची सत्ता येईल आणि पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited BY- Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासला धरण साखळीत ९१.९४ टक्के पाणीसाठा

Kalyan Rain : कल्याणला पावसाचा तडाखा, पोलीस ठाण्यात घुसलं पाणी | VIDEO

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT